Giorgia Meloni : इटलीच्या PM मेलोनी पार्टनरपासून झाल्या वेगळ्या; दहा वर्षांचं नातं तोडण्याचं कारण काय?

Giorgia Meloni
Giorgia Meloniesakal
Updated on

नवी दिल्लीः इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी पार्टनरपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या पार्टनरने महिला सहकाऱ्यांबद्दल आक्षेपार्ह टिपण्णी केली होती. त्यामुळे मेलोनी पार्टनरपासून वेगळ्या झाल्या आहेत. मागील दहा वर्षांचं नातं त्यांनी सोडलं आहे.

मेलोनी जॉर्जिया यांचे पार्टनर एंड्रिया जियाम्ब्रूनो हे एक टीव्ही पत्रकार आहेत. त्यांचे दोन ऑफ एअर रेकॉर्डिंग दोन दिवसांपूर्वी पुढे आले होते. त्यानंतर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली. पार्टनरपासून वेगळं होण्याच्या निर्णयाची माहिती देताना पंतप्रधानांनी लिहिलं की, एंड्रिया जियाम्ब्रूनो यांच्यासोबत माझं नातं जवळपास १० वर्षांपासून होतं. मात्र आता ते संपुष्टात येत आहे.

Giorgia Meloni
India Canada Conflict : कॅनडाने भारतातील 41 राजदूतांना बोलावलं माघारी; मुंबईसह तीन वाणिज्य दूतावासातील कामे रखडणार

एंड्रिया हे मीडियासेट न्यूज टॉक शो Diaro Del Giorno चे प्रेझेंटर आहेत. त्यांच्या दोन ऑफ एअर रेकॉर्डिंग दोन दिवसांपूर्वी पुढे आलेल्या होत्या. या रेकॉर्डिंग्समध्ये ते एका महिला सहकाऱ्याविषयी आक्षेपार्ह आणि अश्लील बोलताना दिसून आले होते.

जॉर्जिया यांना एंड्रिया यांच्यापासून सात वर्षांची मुलगी आहे. मेलोनी यांनी पुढे लिहिलं की, आम्ही सोबत घालवलेले आनंदाचे क्षण आणि संकटांना तोंड देताना दाखवलेली एकी विसरु शकत नाहीत. शिवाय आमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमची मुलगी जिनेवरा. त्यासाठी मी एंड्रिया यांचे आभार मानते. आमचे रस्ते आता वेगळे झाले आहेत, हे आता स्वीकार करावं लागेल. त्यांनी याबाबत ट्वीटरवर पोस्ट केलीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.