Italy in Debt : मेलोनींच्या इटलीवर 2.8 ट्रिलियन युरोचे कर्ज! सरकार विकणार देशाचा 'कोहिनूर'

Italy in Debt : जॉर्जिया मेलोनी यांच्या नेतृत्वाखालील देश इटली सध्या मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे.
Italy in 2 billion euros debt pm giorgia meloni plans to sell country crown jewel
Italy in 2 billion euros debt pm giorgia meloni plans to sell country crown jewel
Updated on

Italy in Debt : जॉर्जिया मेलोनी यांच्या नेतृत्वाखालील देश इटली सध्या मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. मेलोनी यांच्या इटलीवर 2.8 ट्रिलियन युरो म्हणजेच 2.50 अब्ज कोटी रुपयांचे कर्ज आहे. यावर मात करण्यासाठी इटलीच्या पीएम मेलोनी आपल्या देशाचा वारसा विक्रीला काढणार आहेत.

पीएम मेलोनी यांनी देशातील पोस्टल सेवेचा काही भाग विकण्याचा निर्णय घेतला आहे. ही तीच टपाल सेवा आहे ज्याला एकेकाळी त्यांच्या पंतप्रधानांनी आपल्या देशाचा 'कोहिनूर' (Crown Jewel) असल्याचे म्हटले होते.

Italy in 2 billion euros debt pm giorgia meloni plans to sell country crown jewel
Thalapathy Vijay Political Party : साऊथच्या 'थलापती विजय'कडून राजकीय पक्षाची घोषणा! 'तमिळगा वेत्री काझम' पक्षातून मांडणार भूमिका

मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मेलोनी 2026 पर्यंत देशातील टपाल सेवेचा लिलाव करून सुमारे 1.80 लाख कोटी रुपये उभारण्याची योजना आखत आहेत.

महत्वाची बाब म्हणजे इटलीची पोस्टल सर्व्हिस (पोस्ट इटालियन) चा रेल्वे कंपनी फेरोवी डेलो स्टॅटो आणि पॉवर कंपनी एनी(Eni) मध्ये हिस्सा आहे. याशिवाय विमा आणि बँकिंगच्या व्यवसायातही सहभाग आहे. सरकारच्या उत्पन्नाचा मोठा हिस्सा यातूनच मिळतो. मात्र सध्या तोट्यात चाललेल्या सरकारला हे इतके मोठे व्हेंचर चालवणे कठीण जात आहे.

Italy in 2 billion euros debt pm giorgia meloni plans to sell country crown jewel
Loksabha Election 2024: तुझं माझं जमेना अन्..! वंचित कार्ड मविआसाठी हुकुमाचा एक्का? प्रकाश आंबेडकरांचं काँग्रेसशी का जुळत नाही?

जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, या लिलावाचा सरकारच्या कर्जावर फारसा परिणाम होणार नाहीये. कारण सरकारवर खूप कर्ज आहे. एका रिपोर्टनुसार, इटलीवर एकूण 2.8 ट्रिलियन युरोचे कर्ज आहे. सध्या इटलीमध्ये सरकारच्या धोरणांवर कडाडून टीका होत आहे. या लिलावांच्या माध्यमातून खड्ड्यात चाललेली आर्थिक स्थिती सुधारण्याचा इटली सरकारचा प्रयत्न आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.