Italy Parliament Viral Video : G-7 परिषदेपूर्वी इटलीच्या संसदेत हाणामारी; नेमका प्रकार काय?

घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर परराष्ट्र मंत्री एंटोनियो तेजानी यांनी खेद व्यक्त करत म्हटलं की, माझ्याकडे शब्द नाहीत. आपल्याकडे जगासमोर आदर्श ठेवायचं आहे.. राजकीय वाद उपस्थित करुन मारहाण करण्याचे प्रकार योग्य नाहीत.
Italy Parliament Viral Video : G-7 परिषदेपूर्वी इटलीच्या संसदेत हाणामारी; नेमका प्रकार काय?
Updated on

Italy Parliament News : इटलीमध्ये जी-७ परिषद होत आहे. त्यापूर्वीच देशाच्या संसदेमध्ये मोठा गोंधळ झाल्याचं चित्र बघायला मिळालं. याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला असून व्हिडीओत एकाला मारहाण होत असल्याचं दिसूय येतंय.

इटलीच्या संसदेत एका बिलावरुन खासदारांमध्ये वादावादी झाली. एकमेकांना धरपकड आणि मारहाण झाल्याची घटना घडली आहे. देशातल्या काही भागांना स्वायत्तता देण्यासंबंधाचं हे विधेयक होतं. काही खासदारांनी या विधेयकाला विरोध केला आणि मग पुढे जे घडलं ते जगाने व्हिडीओच्या माध्यमातून बघितलं आहे.

Italy Parliament Viral Video : G-7 परिषदेपूर्वी इटलीच्या संसदेत हाणामारी; नेमका प्रकार काय?
IT Sector: आयटी क्षेत्रावर मंदीचे सावट! मोठ्या कंपन्यांमध्ये 10,000 फ्रेशर्स ऑनबोर्डिंगच्या प्रतीक्षेत

व्हिडीओत दिसतंय की, विरोधी पक्षाचे खासदार लियोनार्डो डोनो हे मंत्री रॉबर्टो कॅलडेरोली यांना इटलीचा झेंडा देण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. परंतु त्यांनी तो झेंडा स्वीकारण्यास नकार दिला आणि मागे सरकले. त्यातच इतर खासदारांनी गर्दी केली आणि बघता बघता वादावादीचं रुपांतर मारहाणीत झालं.

घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर परराष्ट्र मंत्री एंटोनियो तेजानी यांनी खेद व्यक्त करत म्हटलं की, माझ्याकडे शब्द नाहीत. आपल्याकडे जगासमोर आदर्श ठेवायचं आहे.. राजकीय वाद उपस्थित करुन मारहाण करण्याचे प्रकार योग्य नाहीत.

Italy Parliament Viral Video : G-7 परिषदेपूर्वी इटलीच्या संसदेत हाणामारी; नेमका प्रकार काय?
NEET Success Story :ना कोचिंग,ना सणवार, मोबाईलवर अभ्यास करून पास केली NEET परीक्षा; ऊसतोड कामगारांच्या मुलाने पूर्ण केले डॉक्टर होण्याचे स्वप्न

इटलीतल्या अपुनियामध्ये ५०व्या जी-७ शिखर संमेलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या परिषदेसाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह जगभरातील मोठ्या अर्थव्यवस्थेचे प्रमुख सहभागी होत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.