इटलीचे PM मारियो यांची राजीनाम्याची घोषणा, राजकीय भुकंपामुळे चर्चा

महाराष्ट्रातील या राजकीय भूकंपानंकर आता ब्रिटनमध्येही सत्ताबदल पाहायला मिळत आहेत.
italy prime minister mario draghi
italy prime minister mario draghi
Updated on
Summary

महाराष्ट्रातील या राजकीय भूकंपानंकर आता ब्रिटनमध्येही (Britain) सत्ताबदल पाहायला मिळत आहेत.

मागील काही दिवसांपासून भारतासह जगभरात अनेक राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. श्रीलंकेतील नागरिकांनी सरकार विरोधी आंदोलनं केलं आहे. नागरिकांनी राज्यकर्त्यांना धारेवर धरलं आहे. याशिवाय भारतातील महाराष्ट्रातही अनेक राजकीय बदल घडलेले पहायला मिळाले आहेत. (italy prime minister mario draghi)

महाराष्ट्रातील या राजकीय भूकंपानंकर आता ब्रिटनमध्येही (Britain) सत्ताबदल पाहायला मिळत आहेत. दरम्यान, इटलीमध्येही मोठा राजकीय भूकंप आला असून इटीलीचे पंतप्रधान मारियो द्राघी (Mario Draghi) यांनी राजीनाम्याची घोषणा केली आहे. त्यांच्यासोबत सत्तेत असणाऱ्या युतीमधील पक्षांनी विश्वासदर्शक ठरावात साथ न दिल्याने पंतप्रधान (Italy PM) मारियो द्राघी (Mario Draghi) यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.

italy prime minister mario draghi
Twitter Down : जगभरातील यूजर्संकडून सोशल मीडियावर तक्रार

यावर इटलीचे राष्ट्रपती (President of Italy) सर्जियो मट्टरेल्ला (Sergio Mattarella) यांनी द्राघी यांचा राजीनामा नाकारत, द्राघी यांनी संसदेला संबोधित करत आपली भूमिका स्पष्ट करण्यास सांगितलं आहे. मारियो द्राघी यांच्या पक्षासोबतच्या युतीतील दुसरा पक्ष असणाऱ्या फाईव्ह स्टार मुव्हमेंट (M5S) पक्षाने विश्वास दर्शक ठरावात मतदान करणं टाळल्याने मारियो द्राघी यांनी औपचारिकपणे पंतप्रधानपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे.

दरम्यान, द्राघी यांच्या युतीतील दुसरा सर्वात मोठा पक्ष असलेला फाईव्ह स्टार मुव्हमेंट (M5S) पक्षाने विश्वासदर्शक ठरावावर बहिष्कार टाकल्याने द्राघी यांचं सरकार अडचणीत आलं. त्यानंतर द्राघी यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली. द्राघी 2021 पासून इटलीच्या पंतप्रधानपदी विराजमान आहेत. सरकारी वृतसंस्थेनुसार, द्राघी यांनी म्हटलं की, 'मी पंतप्रधान पदाचा राजीनामा देत असल्याचं जाहील करतो.'

italy prime minister mario draghi
पत्नीने मंगळसूत्र काढणं ही सर्वोच्च पातळीवरील मानसिक क्रूरता : हायकोर्ट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.