Japan Birth Rate: जपानच्या जन्मदरात विक्रमी घट! एक बाळ जन्माला येतं तेव्हा दोन व्यक्तींचा होतो मृत्यू
Japan Birth Rate : जपानच्या जन्मदरानं यंदा सर्वात निचांकी पातळी गाठली आहे. यामुळं जपानमध्ये संमिश्र विचारप्रवाह आहे. सलग आठव्या वर्षी जपानच्या जन्मदरात घसरगुंडी झाली असली तरी २०२३ वर्षातला हा विक्रमच ठरला आहे. यामध्ये एक बाळ जन्माला आलं तर दोन व्यक्तींचा मृत्यू झालेला असतो. (Japan birth rate hits record low over two people died for every baby born)
रॉयटर्सच्या माहितीनुसार, जपानंमध्ये जन्म घेतलेल्या बाळांची संख्या एका वर्षापूर्वीच्या तुलनेत 5.1 टक्क्यांनी घसरून 7,58,631 वर आली आहे. तर विवाहांची संख्या 5.9 टक्क्यांवरुन घसरून 4,89,281वर आली आहे. 90 वर्षांमध्ये प्रथमच ही संख्या 5,00,000च्या खाली गेली. यामुळं जपानच्या लोकसंख्येमध्ये आणखी घट होण्याची शक्यता आहे. (Latest Marathi News)
जपानमधील जन्म-मृत्यूंच्या ताज्या डेटाबद्दल सांगताना जपान सरकारच्या मुख्य प्रवक्त्यानं सांगितले की, घटत्या जन्मदराचा सामना करण्यासाठी सरकार अभूतपूर्व पावलं उचलेल, जसं की बालसंगोपनाचा विस्तार करणं आणि तरुण कामगारांसाठी वेतनवाढीला प्रोत्साहन देणं.
त्याचबरोबर मुख्य कॅबिनेट सचिव योशिमासा हयाशी यांनी पत्रकारांना सांगितलं की, "घसरणारा जन्मदर गंभीर स्थितीत आहे. पुढील सहा वर्षे किंवा सन 2030 पर्यंत, जेव्हा तरुण लोकांची संख्या झपाट्यानं कमी होईल, तेव्हा हा ट्रेंड उलट करण्याची शेवटची संधी आम्हाला असेल"
संभाव्य सामाजिक आणि आर्थिक स्थिती तसेच अर्थव्यवस्थेवरील ताण लक्षात घेता, पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी या 'आपल्या देशाला तोंड द्यावं लागणारं हे सर्वात गंभीर संकट' असल्याचं म्हटलं आहे. गेल्या वर्षीच्या अखेरीस मूल जन्माला घालणाऱ्या कुटुंबांना अनेक सवलती जाहीर करण्यात आल्या होत्या. (Marathi Tajya Batmya)
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पॉप्युलेशन अँड सोशल सिक्युरिटी रिसर्चच्या अंदाजानुसार, "जपानच्या लोकसंख्येत 2,070 पर्यंत सुमारे 30 टक्क्यांनी घट होऊन ती 87 दशलक्ष अर्थात ८.७ कोटी होईल. यांमध्ये 65 किंवा त्याहून अधिक वयाचे प्रत्येकी 10 पैकी चार लोक असतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.