Japan Law : जपानमध्ये कायद्यात ऐतिहासिक बदल! सहमतीने संबंधांच्या वयात वाढ, बलात्काराची व्याख्या बदलली

यापूर्वी सहमतीने संबंधांचं वय १३ वर्षे होतं, तर आता ते वाढवून १६ वर्षे करण्यात आलं आहे.
Japan Law Amendment
Japan Law AmendmenteSakal
Updated on

जपानने आपल्या कायद्यामध्ये ऐतिहासिक बदल केला आहे. यामध्ये जपान सरकारने बलात्काराच्या व्याख्येमध्ये बदल केला आहे, तसंच सहमतीने संबंधाच्या वयात देखील वाढ केली आहे. यापूर्वी सहमतीने संबंधांचं वय १३ वर्षे होतं, तर आता ते वाढवून १६ वर्षे करण्यात आलं आहे. शुक्रवारी जपानच्या संसदेत या कायद्याला मंजूरी देण्यात आली.

जपानमधील बलात्कारासंबंधी कायद्यांमध्ये गेल्या शतकापासून कोणताही मोठा बदल करण्यात आला नव्हता. तसंच, जपानमधील सहमतीने संबंध ठेवण्याचं वय हे जगात सर्वात कमी होतं. १९०७ नंतर पहिल्यांदाच हे वय बदलण्यात आलं आह. त्यामुळे शुक्रवारी करण्यात आलेला हा बदल ऐतिहासिक मानला जातोय.

Japan Law Amendment
Japan Population: टोकियो सोडणाऱ्या कुटुंबांना जपान सरकार लाखो रुपये का देत आहे ?

व्याख्येत काय बदल?

जपानमध्ये या कायद्याच्या माध्यमातून बलात्काराची व्याख्या बदलण्यात आली आहे. यापूर्वीची बलात्काराची व्याख्या 'हल्ला' करून, किंवा 'धमकी' देऊन, किंवा 'बेशुद्धावस्थेत' प्रस्थापित केलेले शारीरिक संबंध अशी होती. मात्र आता ती बदलून 'असहमतीने' प्रस्थापित केलेले शारीरिक संबंध अशी करण्यात आली आहे

अनेक वर्षांचा लढा

गेल्या कित्येक वर्षांपासून बलात्काराच्या कमकुवत व्याख्येमुळे अनेक दोषी कायद्याच्या कचाट्यातून सुटले होते. उदाहरण द्यायचे झाल्यास, २०१४ साली टोकियोमध्ये एका व्यक्तीने १५ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला होता. मात्र यावेळी तिला प्रतिकार करायला वाव होता, असं म्हणत या व्यक्तीवरील बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यात आला होता. या सुनावणीदरम्यान १५ वर्षांच्या मुलीला सज्ञान असं समजलं गेलं होतं. अशाच भरपूर प्रकरणांमध्ये दोषींची मुक्तता होत असल्यामुळे जपानमधील जनतेत रोष होता.

Japan Law Amendment
Currency Note Press: प्रेसचा चेहरामोहरा लवकरच बदलणार; जपान, ऑस्ट्रियामधून 12 अत्याधुनिक मशिन खरेदी

२०१९ मध्ये जपानच्या जनतेने याबाबत मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरून निदर्शने केली होती. यानंतर एप्रिल २०१९ नंतर प्रत्येक महिन्याच्या ११व्या दिवशी संपूर्ण जपानमधील सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक एकत्र येऊन न्याय मागत होते.

आणखी काही बदल

आताच्या सुधारणेमध्ये जपानच्या या कायद्यात आणखीही काही बदल करण्यात आले आहेत. बलात्काराची तक्रार दाखल करण्यासाठीची मुदत ही यापूर्वी १० वर्षे होती, मात्र आता ती १५ वर्षे करण्यात आली आहे. पीडितेला आपल्या ट्रॉमामधून बाहेर येऊन तक्रार दाखल करण्याच्या मानसिक तयारीसाठी पुरेसा वेळ मिळावा यासाठी हा बदल करण्यात आला आहे.

Japan Law Amendment
Japan PM: जपानी पंतप्रधानांच्या मुलाने अधिकृत निवासस्थानी केली पार्टी, फोटो झाले व्हायरल अन् गमावाव लागलं पद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.