AI is America-India : मोदींच्या वाक्याने बायडेन झाले खुश; पंतप्रधानांना दिलं खास गिफ्ट

याचा संबंध खरंतर पंतप्रधान मोदींच्या यूएस काँग्रेसमधील भाषणाशी आहे.
AI is America-India
AI is America-IndiaeSakal
Updated on

पंतप्रधान मोदी गेले चार दिवस अमेरिका दौऱ्यावर होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी मोदी यांना स्टेट व्हिजिटसाठी आमंत्रित केले होते. या दौऱ्यामध्ये पंतप्रधान मोदींनी अमेरिकेच्या काँग्रेसलाही संबोधित केले. या दौऱ्याच्या समारोपावेळी बायडेन यांनी मोदींना खास गिफ्ट दिलं.

बायडेन यांनी मोदींना गिफ्ट म्हणून एक टी-शर्ट दिला आहे. या टी-शर्टवर 'The Future is AI America & India' असं लिहिलं आहे. याचा संबंध खरंतर पंतप्रधान मोदींच्या यूएस काँग्रेसमधील भाषणाशी आहे.

AI is America-India
PM Modi in US : मोदींच्या अमेरिका दौऱ्याचं फलित! भारतात गुगल १० बिलियन, तर अमेझॉन १५ बिलियन डॉलर्सची करणार गुंतवणूक

एआयची नवी व्याख्या

गुरुवारी झालेल्या यूएस काँग्रेसच्या बैठकीला पंतप्रधान मोदी यांनी संबोधित केले होते. यावेळी बोलताना पंतप्रधानांनी एआयची नवी व्याख्या सांगितली होती. "गेल्या काही वर्षांपासून एआय म्हणजेच आर्टिफिशिअल इंटेलिजन्समध्ये भरपूर प्रगती झाली आहे. आजचा काळ हा एआयचा आहे. मात्र, आज मी तुम्हाला एआयची नवी व्याख्या सांगतो. एआय म्हणजे अमेरिका-इंडिया" असं पंतप्रधान मोदी म्हणाले होते.

पंतप्रधान मोदींचं हे वाक्य जो बायडेन यांना एवढं आवडलं, की त्यांनी ते थेट टी-शर्टवर छापून घेतलं. हाच टी-शर्ट त्यांनी पंतप्रधान मोदींना गिफ्ट म्हणून दिला आहे.

या प्रसंगाचा फोटो पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ऑफिशिअल ट्विटर अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. "एआय हेच भविष्य आहे, मग ते आर्टिफिशिअल इंटेलिजन्स असो किंवा अमेरिका-इंडिया! जेव्हा आपण एकत्र असतो तेव्हाच आपण मजबूत असतो, आणि जगाला अधिक चांगलं बनवतो" अशा आशयाचं कॅप्शन या फोटोला दिलं आहे.

AI is America-India
PM मोदींचा US दौरा ठरला महत्वाचा, भारतात निर्माण होणार मोठा रोजगार! IT राज्यमंत्र्यांनी केले स्पष्ट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.