"चीनची ही मोठी चूक!" जो बायडन यांनी चीनला का झापलं?

JOE BIDEN
JOE BIDENFILE PHOTO
Updated on

ग्लास्गो: अमेरिका आणि चीन या दोन्ही देशांदरम्यान सध्या अनेक मुद्यांवर शीत युद्धांसारखं वातावरण आहे. दोन्ही देश एकमेकांवर सातत्याने निशाणा साधताना दिसून येतात. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden, Xi Jinping) यांनी आता चीनचे राष्ट्राध्यक्षांवर टीका केली आहे. त्यांनी म्हटलंय की, शी जिनपिंग यांनी जी-20, COP26 मध्ये (Climate Summit) सहभागी न होऊन मोठी चूक केली आहे. (Joe Biden Slams China Russia For Skipping Climate Summit)

JOE BIDEN
विकसित देश ठरले अपयशी; भारताची टीका

चीन आणि रशिया हे दोन्हीही देश या संमेलनात सहभागी झालेले नव्हते. या दोन्हीही देशांनी सहभागी होण्याचं टाळल्यामुळे बायडन यांनी म्हटलंय की, मला वाटतंय की ही एक खूप मोठी चूक आहे. जग चीनकडे पाहिल आणि सांगू शकेल की त्यांनी कोणती मूल्ये वाढवली आहेत. त्यांनी कॉपमध्ये जगभरातील लोकांना प्रभावित करण्याची क्षमता गमवली आहे. याचप्रकारे मी रशियासंदर्भातही युक्तीवाद करेन.

20 महिन्यांपासून चीनमध्येच जिनपिंग

रोममध्ये जी-20 देशांची बैठक आणि ग्लासगोमध्ये पर्यावरणासंदर्भातील संमेलनामध्ये चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी सहभागी होणं टाळलं आहे. गेल्या 20 महिन्यांपासून त्यांनी चीनच्या बाहेर एक पाऊलही ठेवलं नाहीये. चीन सरकारने याबाबत काहीच स्पष्टीकरण दिलं नसलं तरी काही जाणकारांनी यामागे कोरोना महासाथीचं कारण असल्याचं सांगितलंय. चीनचे राष्ट्राध्यक्ष आपल्या देशातील सत्तेवरील नियंत्रण अधिक मजबूत करण्यावर भर देत असल्याचंही बोललं जातंय.

JOE BIDEN
Facebook चा आणखी एक महत्वाचा निर्णय, 'हे' फिचर होणार बंद

विकसित देश ठरले अपयशी; भारताची टीका
‘पर्यावरण संवर्धनासाठी विकसनशील देशांना दरवर्षी १०० अब्ज डॉलरची मदत देण्याचे लक्ष्य साध्य करण्यात विकसित देशांना २००९ पासून सातत्याने अपयश येत आहे. विशेष म्हणजे, हे आपले २०२५ पर्यंतचे लक्ष्य आहे, असा दावा हे विकसित देश करत आहेत,’ अशी टीका पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी भारताच्या वतीने जागतिक हवामान परिषदेत केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.