जॉन्सन अँड जॉन्सन लशीचा एक डोस कोरोना विषाणूच्या डेल्टा व्हेरियंटवर प्रभावी असल्याचा दावा करण्यात आला आहे. लस डेल्टा व्हेरियंटचा संसर्ग रोखते शिवाय दीर्घ काळासाठी या विषाणूपासून संरक्षण पुरवते असेही सांगण्यात आलं आहे
नवी दिल्ली- जॉन्सन अँड जॉन्सन लशीचा एक डोस कोरोना विषाणूच्या डेल्टा व्हेरियंटवर प्रभावी असल्याचा दावा करण्यात आला आहे. लस डेल्टा व्हेरियंटचा संसर्ग रोखते शिवाय दीर्घ काळासाठी या विषाणूपासून संरक्षण पुरवते असेही सांगण्यात आलं आहे. कंपनीने गुरुवारी जारी केलेल्या निवेदनात सांगितलं की, 'लस व्हेरियंटविरोधात मुबलक आणि शक्तीशाली अँटिबॉडी तयार करते. शिवाय सर्व प्रकारच्या विषाणूपासून आठ महिन्यांपर्यंत संरक्षण पुरुवते.' जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीच्या या घोषणेमुळे कोरोनाविरोधातील लढ्यात प्रभावी अस्त्र मिळाल्याची चर्चा सुरु झाली आहे. (Johnson and Johnson single shot coronavirus vaccine neutralizes the fast-spreading delta variant )
डेल्टा व्हेरयंट पहिल्यांदा भारतात आढळून आला होता. त्यानंतर तो सर्व जगभर पसरला. कोरोनाचा डेल्टा व्हेरियंट अधिक वेगाने पसरणारा असल्याचं सांगितलं जातंय. डेल्टा व्हेरियंट ब्रिटनमध्ये मोठ्या प्रमाणात पसरला असून तो चिंतेचा विषय ठरला आहे. जॉन्सन अँड जॉन्सनची लस फायझर आणि मॉडर्ना लशीपेक्षा कमी प्रभावी असल्याने बुस्टर शॉट देण्याची गरज असल्याची चर्चा सुरु झाली होती. यावर कंपनीने स्पष्टीकरण दिलं असून याचं खंडन केलं आहे.
आम्ही अत्यंत आनंदी आहोत. तसेच आम्हाला आत्मविश्वास आहे की नव्या व्हेरियंटविरोधात लढण्यासाठी बुस्टर शॉटची आवश्यकता नाही, असं जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीचे ग्लोबल प्रमुख जॉन वॅन हूफ यांनी एका मुलाखतीत म्हटलं. लशीचा पहिला डोस घेतल्यानंतर 29 दिवसानंतर डेल्टा व्हेरियंटचा शरीरावर कसलाही परिणाम होणार नाही, असंही त्यांनी सांगितलं आहे.
कोरोना विषाणू सातत्याने आपलं स्वरुप बदलत आहे. चीनच्या वुहानमध्ये सापडलेल्या विषाणूने आतापर्यंत अनेक वेगवेगळे रुप घेतले आहेत. विषाणूचे डेल्टा रुप अधिक घातक असल्याचं सांगितलं जात आहे. त्यादृष्टीने वैज्ञानिक लस निर्मितीमध्ये काही बदल करत अपडेटेड व्हर्जन समोर आणत आहेत. त्यामुळे या लशी कोरोना विषाणूविरोधात प्रभावी ठरतील अशी आशा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.