पठ्ठ्याचे ६ वेगवेगळ्या भाषेत रिपोर्टिंग, पाहा पत्रकाराचा Viral Video

journalist philip crowther reporting  on russia ukraine crisis in 6 languages video goes viral
journalist philip crowther reporting on russia ukraine crisis in 6 languages video goes viral
Updated on

रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेला वादाकडे (Russia-Ukraine crisis) सगळ्या जगाचे लक्ष लागून राहीले आहे. जगभरातील नेते आणि लोक या संकटाकडे डोळे लावून बसले आहेत, या दरम्यान एका पत्रकाराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral) होत आहे. हा रिपोर्टर युक्रेनमधून घडत असलेल्या घटनांचे वार्तांकन करत आहे. यात आश्चर्याची बाब म्हणजे हा रिपोर्टर एकटाच तब्बल सहा भाषांमध्ये रिपोर्टिंग करतोय.

फिलिप क्रॉथर (Philip Crowther) असे या रिपोर्टरचे नाव असून डेली मेलच्या ऑनलाइन रिपोर्टनुसार, फिलिप असोसिएटेड प्रेस ग्लोबल मीडिया सर्व्हिसेसशी सलग्न पत्रकार आहे. फिलिप हे सध्या युक्रेनची राजधानी कीव येथून इतर अनेक माध्यमासांठी रिपोर्टिंग करत आहेत. यात सर्वात महत्त्वाची आश्चर्याची गोष्ट म्हणजे फिलिप त्याच्या व्हायरल व्हिडिओंमध्ये ते सहा वेगवेगळ्या भाषांमध्ये सहजपणे रिपोर्टिंग करत आहेत.

journalist philip crowther reporting  on russia ukraine crisis in 6 languages video goes viral
शिवसेनेचे युपीत ३७ उमेदवार रिंगणात; आदित्य ठाकरे करणार प्रचार

या रिपोर्टनुसार, फिलिप क्रॉथर इंग्रजी, लक्झेंबर्गिश, स्पॅनिश, पोर्तुगीज, फ्रेंच आणि जर्मन या सहा वेगवेगळ्या भाषांमध्ये अस्खलितपणे बोलत आहेत. तसेच त्यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर, सहा भाषांमध्ये त्याच्या रिपोर्टिंगचा व्हिडिओ शेअर केला. त्याच्या या व्हिडिओमध्ये ते अनेक न्यूज सर्व्हिसेससाठी रिपोर्टिंग करताना दिसत आहेत, ज्याला जगभरातील नेटकऱ्यांकडून चांगलाच प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या व्हिडिओला एका दिवसात 1.8 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, तर आत्तापर्यंत हा व्हिडिओ 3.7 मिलियन पेक्षा जास्त युजर्सनी पाहिला आहे.

journalist philip crowther reporting  on russia ukraine crisis in 6 languages video goes viral
अरे वा! लाँच झाली 100 रुपयांची SIP, मिळेल गुंतवणुकीची उत्तम संधी

फिलिप हे कीवमधूनच रशिया-युक्रेन संकटासंबंधी माहिती देत ​​आहेत यात त्यांना सोशल मीडियावर पाहणाऱ्या प्रेक्षकांनी सहा भाषा अस्खलितपणे बोलल्याबद्दल त्यांचे कौतुक केले आहे. सध्या जगभरातील लोकांच्या नजरा रशिया-युक्रेनच्या संकटाकडे लागल्या आहेत, परंतु फिलिप क्रॉथर यांनी त्यांच्या कौशल्याच्या बळावर अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

journalist philip crowther reporting  on russia ukraine crisis in 6 languages video goes viral
रेडमीचा 5G फोन भारतात लॉंच; स्वस्तात मिळतायेत भन्नाट फीचर्स

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.