2024 US Elections : नव्या पिढीकडे सूत्रे सोपवितोय;ज्यो बायडेन ;कमला हॅरिस या ‘डेमॉक्रॅटिक’च्या उमेदवार

अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेण्यासंबंधी बुधवारी (ता.२४) प्रथमच भूमिका जाहीर केली. ‘‘अमेरिकेत २०२४ मध्ये होणाऱ्या अध्यक्षीय निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय मी घेत आहे.
2024 US Elections
2024 US Elections sakal
Updated on

वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेण्यासंबंधी बुधवारी (ता.२४) प्रथमच भूमिका जाहीर केली. ‘‘अमेरिकेत २०२४ मध्ये होणाऱ्या अध्यक्षीय निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय मी घेत आहे. आता कमला हॅरिस या डेमॉक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार असतील. देश आणि पक्षाच्या एकजुटीसाठी नवीन पिढीच्या हाती सूत्रे सोपविणे आवश्‍यक आहे,’’ असे ते म्हणाले.

अध्यक्षीय निवडणुकीत उतरणार नसल्याचे स्पष्ट करीत बायडेन यांनी रविवारी (ता.२१) प्रचारातून माघार घेतली. त्यानंतर तीन दिवसांनी बायडेन यांनी अमेरिकेच्या नागरिकांना उद्देशून ‘ओव्हल ऑफिस’मधून भाषण केले. ‘‘नवीन पिढीकडे सूत्रे सोपविण्याचा मी योग्य निर्णय घेतला आहे. आपल्या देशाला एकसंध ठेवण्यासाठी हा उत्तम मार्ग आहे. प्रदीर्घ अनुभवामुळे मी अजून काही काळ सार्वजनिक जीवनात राहू शकतो. पण नव्या पिढीच्या ताज्या आवाज ऐकण्यासही येथे जागा आहे आणि त्यांच्याकडे सूत्रे सोपविण्याची हीच वेळ आहे,’’असे सांगताना ते भावनिक झाले होते.

बायडेन म्हणाले, की अध्यक्षीय कार्यालयाबद्दल मला आदर आहे, परंतु माझ्या देशावर माझे अधिक प्रेम आहे. अध्यक्षपदी काम करणे हा माझ्या आयुष्यातील सन्मान आहे. पण जी लोकशाही आज धोक्यात आली आहे, ती माझ्यासाठी कोणत्याही बहुमानापेक्षा महत्त्वाची आहे.’’ अध्यक्षपदाची माझी कारकीर्द, जागतिक पातळीवरील माझे नेतृत्व, अमेरिकेच्या भविष्यासाठी माझे विचार दुसऱ्या कालावधीसाठी योग्य आहेत. पण आपल्या लोकशाहीच्या संरक्षणाच्या मार्गात काहीही अडथळे येऊ शकत नाहीत. अगदी वैयक्तिक महत्त्वाकांक्षाही नाही. म्हणूनच नव्या पिढीच्या हाती सूत्रे सोपविण्याचा निर्णय मी घेतला आहे,’’ असे त्यांनी सांगितले.

‘आता निर्णय तुमच्या हाती’

उपाध्यक्षा कमला हॅरिस आणि अध्यक्षपदाच्या उमेदवार कमला हॅरिस यांची स्तुती करताना बायडेन म्हणाले, की त्या अनुभवी आहेत, कणखर आहेत, सक्षम आहेत. साडेतीन वर्षे एकत्र काम करताना त्या कार्यक्षम सहकारी ठरल्या आहेत. मी माझा पर्याय दिला आहे. माझी भूमिकाही मांडली आहे. आता अमेरिकेचे नागरिक म्हणून आता तुमच्यावर निर्णय सोपविला आहे, अशी साद त्यांनी घातली.

हॅरिस यांना मिळणार ओबामांचा पाठिंबा

अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी विद्यमान अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी माघार घेऊन उपाध्यक्षा कमला हॅरिस यांचे नाव जाहीर केले आहे. डेमॉक्रॅटिक पक्षाच्या बहुतेक सदस्यांनी त्यांना पाठिंबा दिला आहे. माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी आतापर्यंत त्यांचा कौल स्पष्ट केला नव्हता, पण त्यांचे समर्थनही हॅरिस यांना मिळण्याची शक्यता, ‘एनबीसी न्यूज’ या वृत्तसंस्थेने व्यक्त केली आहे. हॅरिस यांची उमेदवारी रविवारी (ता.२१) जाहीर झाली, तेव्हापासून ओबामा सतत, त्यांच्या संपर्कात होते. ओबामा यांनी हॅरिस यांच्या उमेदवारीला खासगीरीत्या पूर्ण पाठिंबा दिला आहे आणि लवकरच ते त्यांना जाहीररीत्या पाठिंबा देतील, असे वृत्त सूत्रांच्या हवाल्याने या वृत्तसंस्थेने दिले आहे. हॅरिस यांना समर्थनबद्दल ओबामांनी भूमिका स्पष्ट केली नसली तरी प्रचाराच्या रणनीतींबद्दल ते हॅरिस यांना मार्गदर्शन करीत आहेत, एका सूत्राने सांगितल्याचे वृत्तात नमूद केले आहे.

‘कमला हॅरिस या डाव्या कट्टरवादी माथेफिरू

‘उपाध्यक्षा कमला हॅरिस या राज्य करण्यास अयोग्य आहेत असे सांगत त्या ‘डाव्या कट्टरवादी माथेफिरू असल्याची असल्याची टीका अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी (ता.२४) केली.अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ट्रम्प यांच्या स्पर्धक उमेदवार हॅरिस असणार आहे. त्यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर ट्रम्प यांनी केलेल्या प्रचारसभेतील भाषणात हॅरिस यांच्यावर कठोर शब्दांत टीका केली. ‘‘गेल्या साडेतीन वर्षांपासून बायडेन यांच्या प्रत्येक आपत्तीमागे लिन कमला हॅरिस या अति उदारमतवादी प्रेरक शक्ती आहेत. हॅरिस या ‘डाव्या कट्टरवादी माथेफिरू आहेत. त्या अमेरिकेच्या अध्यक्ष झाल्यास आपल्या देशाचा विनाश करतील. आम्ही हे कदापि होऊ देणार नाही,’’ असा इशारा त्यांनी दिला. बायडेन यांना पूर्वी ‘स्लिपी ज्यो’ म्हणणाऱ्या ट्रम्प यांनी हॅरिसला ‘लिन कमला’ हे टोपणनाव दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.