Kamala Harris ; कमला हॅरिस यांची वाटचाल

अमेरिकेतील कॅलिफोर्नियातील ऑकलंडमध्ये जन्मलेल्या कमला हॅरिस अमेरिकेचे प्रख्यात कायदेपंडित, नागरी अधिकार कार्यकर्ते व सर्वोच्च न्यायालयाचे माजी सह-न्यायाधीश थर्गुड मार्शल यांना आपले प्रेरणास्थान मानतात.
Kamala Harris
Kamala Harrissakal
Updated on

अमेरिकेतील कॅलिफोर्नियातील ऑकलंडमध्ये जन्मलेल्या कमला हॅरिस अमेरिकेचे प्रख्यात कायदेपंडित, नागरी अधिकार कार्यकर्ते व सर्वोच्च न्यायालयाचे माजी सह-न्यायाधीश थर्गुड मार्शल यांना आपले प्रेरणास्थान मानतात. नागरी हक्क चळवळीत गुंतलेल्या आपल्या पालकांनी केलेल्या संगोपनाबद्दलही त्या अनेकदा बोलतात. त्यांचे अर्थतज्ज्ञ वडील आणि कर्करोगतज्ज्ञ आईची कॅलिफोर्निया विद्यापीठात पदवीला शिकत असताना भेट झाली होती. ‘न्याय’ या गोष्टीसाठी आपल्या आई-वडिलांनी मोर्चा, घोषणाबाजीत बराच वेळ घालविला, अशी आठवणही हॅरिस सांगतात.

यापूर्वी २०२० मध्ये अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवत असताना ज्यो बायडेन यांनी उपाध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून त्यांची निवड केली होती. निर्भय योद्ध्या असे बायडेन यांनी त्यांचे वर्णन केले होते. अध्यक्षपदाऐवजी उपाध्यक्षपदाची उमेदवारी मिळाली म्हणून त्या डगमगल्या नव्हत्या. त्यानंतर कृष्णवर्णीय व दक्षिण आशियाई वंशाच्या असलेल्या हॅरिस अमेरिकेच्या पहिल्या महिला उपाध्यक्ष म्हणून निवडून आल्या होत्या. हॉवर्ड युनिव्हर्सिटीच्या पदवीधर असलेल्या हॅरिस कृष्णवर्णीय महाविद्यालय किंवा विद्यापीठातील अध्यक्ष किंवा उपाध्यक्षपद भूषविणाऱ्याही पहिल्या व्यक्ती ठरल्या. उपाध्यक्ष म्हणून त्यांनी अध्यक्ष बायडेन यांच्या सूचनेवरून देशांच्या सीमा सुरक्षित करण्यासारख्या सर्वांत आव्हानात्मक बाबींचा सामना केला. ५९ वर्षीय हॅरिस या लॉस ऐंजल्सच्या वकील डग्लस एमहॉफ यांच्याशी विवाह केला आहे.

कॅलिफोर्नियाच्या ॲटर्नी जनरल म्हणून दोनदा निवडून आल्यानंतर कमला हॅरिस २०१६ मध्ये अमेरिकेच्या सिनेटमध्ये विजयी झाल्या होत्या. नफ्यासाठी विद्यार्थ्यांचे आर्थिक शोषण करणाऱ्या महाविद्यालयांविरुद्ध तसेच पर्यावरणीयदृष्ट्या चुकीचे काम करणाऱ्यांविरुद्धही त्यांनी लढा दिला होता. त्या वर्षोनुवर्षे गुन्ह्यांची पुनरावृत्ती आणि गुन्हेगारी न्याय सुधारणांबद्दल भूमिका मांडत आहेत.

मस्क-खोसला यांच्यात वाक्‌युद्ध

बायडेन यांनी माघार घेतल्यावरून चर्चा सुरू असताना भारतीय वंशाचे अमेरिकी उद्योगपती विनोद खोसला आणि जगप्रसिद्ध उद्योगपती एलॉन मस्क यांच्यात सोशल मीडियावर वाक्‌युद्ध रंगले होते. ‘कोणतीही नीतिमत्ता नसलेल्या, खोटारड्या, फसविणाऱ्या, बलात्कारी आणि महिलांवर अत्याचार करणाऱ्या ट्रम्प यांना पाठिंबा देणे अवघड आहे. ते स्थलांतरितांचा द्वेष करतात,’ असे मत खोसला यांनी ‘एक्स’वर व्यक्त केले होते.

यावर प्रतिक्रिया देताना मस्क यांनी ‘ट्रम्प हे तुमचा द्वेष करत नाहीत,’ असा टोला मारला. दुसऱ्या एका घटनेत, मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये बायडेन यांनी निवडणूक लढविण्याची इच्छा जाहीर केली होती, तेव्हाच रिपब्लिकन पक्षाचे भारतीय वंशाचे नेते विवेक रामास्वामी यांनी ‘बायडेन हे उमेदवार नसतील’ असे भाकीत केले होते. ते खरे ठरल्याचे आज त्यांनी सर्वांच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर मस्क यांनी ‘तुमची सगळी भाकिते खरी ठरतात,’ अशी प्रतिक्रिया दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.