कर्नाटकात सुरु असलेल्या हिजाब (Hijab Row) प्रकरणाचे पडसाद देशभरात उमटत असतानाच आंतरराष्ट्रीय पातळीवर ही याचे पडसाद उमटू लागले आहेत. अनेक देशांकडून यासंदर्भात प्रतिक्रिया येत आहेत. याबाबात भारताने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. कर्नाटकातील काही शैक्षणिक संस्थां मधील ड्रेसकोडवर काही देशांनी टीका-टिप्पणी सुरु केली आहे. यावर परराष्ट्र मंत्रालयाने खडे बोल सुनावले आहेत. कर्नाटक उच्च न्यायालयात या प्रकरणाची छाननी सुरु आहे. मात्र, अशावेळी देशाच्या अंतर्गत मुद्द्यांवर इतर कोणत्याही देशाची टीका खपवून घेतली जाणार नाही असे परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले. पाकिस्तानने (Pakistan) ही हिजाब वादावरही भाष्य केले आहे.
देशाच्या अंतर्गत मुद्द्यांवर इतर कोणत्याही देशाची टीका खपवून घेतली जाणार नाही असे परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले, कर्नाटकमधील काही शैक्षणिक संस्थांमधील ड्रेस कोडशी संबंधित प्रकरणावर कर्नाटक उच्च न्यायालयात (Karnataka High Court) सुनावणी सुरू आहे. कोणताही निर्णय घेताना आमच्या देशाची संविधानिक चौकट, यंत्रणा, लोकशाही, आचारसंहिता आणि राजकारण या मुद्यांचा विचार केला जातो. ज्या नागरीकांना भारता विषयी माहित आहे अशा नागरीकांना वेगळे सांगायची गरज नाही. मात्र, आमच्या अंतर्गत मुद्द्यांवर टीका खपवून घेतली जाणार नाही असा इशारा बागची यांनी दिला.
हिजाबच्या वादात अमेरिकाही उतरली
कर्नाटकात सुरू असलेल्या हिजाबच्या वादावर अमेरिकेनेही आपली प्रतिक्रिया दिली आहे. यूएस (America)सरकारमधील आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्याचे राजदूत रशाद हुसेन म्हणाले , धार्मिक स्वातंत्र्यामध्ये लोकांना त्यांचे धार्मिक कपडे निवडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असते. शाळांमधील हिजाबवरील बंदी धार्मिक स्वातंत्र्याचे उल्लंघन करते. याचा परिणाम महिला आणि मुलीं कलंकित होतात आणि दुर्लक्षित होतात. त्यामुळे कर्नाटक सरकारने धार्मिक पोशाख संदर्भात असे नियम घालू नये.
पाकिस्तानने भारतीय दूतावासाच्या प्रभारींना बोलावले
पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने बुधवारी उशिरा दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मुस्लिम महिलांच्या सुरक्षेसाठी पुरेशा उपाययोजना करण्यावर भारताने भर द्यावा. भारतात धार्मिक असहिष्णुता, नकारात्मक रूढी, कलंक आणि मुस्लिमांविरुद्धच्या भेदभावाबद्दल पाकिस्तानात चिंता व्यक्त करण्यात आली आहे. यासाठी पाकिस्तानने भारतीय दूतावासाच्या प्रभारींना बोलावले आहे. मुस्लिम विद्यार्थिनींना हिजाब घालण्यावर बंदी घालण्याबाबत पाकिस्तान सरकारने गंभीर चिंता व्यक्त केली आहे.
पाकिस्तानचे मंत्रीही वादात उतरले
हिजाबच्या वादात पाकिस्तानच्या अनेक मंत्र्यांनीही उड्या घेतल्या आहेत.पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी म्हणाले,मुस्लिम मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवणे हे मूलभूत मानवी हक्कांचे उल्लंघन आहे. तर माहिती आणि प्रसारण मंत्री फवाद हुसैन म्हणाले की,भारतात जे काही चालले आहे ते भयावह आहे. हिजाब घालणे ही वैयक्तिक निवड आहे, नागरिकांना तसे स्वातंत्र्य दिले पाहिजे असे हुसैन म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.