केनिया दुष्काळाच्या छायेत! मृत जिराफांची हृदयद्रावक छायाचित्रे समोर

सप्टेंबरपासून केनियाच्या उत्तर भागात सामान्यापेक्षा ३० टक्के कमी पाऊस पडला आहे
Dead giraffes
Dead giraffesDead giraffes
Updated on

केनियाला (Kenya) भीषण दुष्काळाचा (Drought) सामना करावा लागत आहे. पाणी आणि अन्नाअभावी वन्यप्राण्यांचा बळी जात आहे. दुष्काळाचा विपरीत परिणाम शेतकऱ्यांवर होत आहे. जिराफांच्या मृत्यूची काही छायाचित्रे समोर आली आहेत, जी हृदयद्रावक आहेत. भुकेने आणि तहानणे मृतावस्थेत पडलेल्या काही जिराफांची (Dead giraffes) हृदयद्रावक छायाचित्रे समोर आली आहेत. केनियाच्या ईशान्येकडील वझीर शहरातील साबुली वन्यजीव अभयारण्यात सहा जिराफ मृतावस्थेत पडलेले दिसतात.

अन्न आणि पाण्याअभावी कमकुवत (Lack of food and water) झालेल्या जिराफांच्या मृत्यूनंतर ही छायाचित्रे घेण्यात आली आहेत. जिराफ जवळच्या कोरड्या जलाशयातून पाणी पिण्याचा प्रयत्न करीत होते. यादरम्यान चिखलात अडकल्याने त्याचा मृत्यू झाला. तेथून त्यांचे मृतदेह वेगळ्या ठिकाणी नेण्यात आले आणि तेथे छायाचित्रे घेण्यात आली. जलाशयातील पाणी दूषित होऊ नये म्हणून तेथून मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. हे छायाचित्र १० डिसेंबर रोजी काढण्यात आले.

Dead giraffes
‘गॅंगरेप’चा बनाव रचणे तरुणीच्या अंगलट; प्रकार उघडकीस येताच गुन्हा

सप्टेंबरपासून केनियाच्या उत्तर भागात सामान्यापेक्षा ३० टक्के कमी पाऊस पडला आहे. त्यामुळे या भागात तीव्र दुष्काळ पडला आहे. पावसाअभावी परिसरातील वन्यजिवांवर फार वाईट परिणाम झाला आहे. परिसरात वन्य प्राण्यांच्या खाण्यापिण्याची टंचाई निर्माण झाली आहे. या दुष्काळाचा पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या जीवनमानावरही खूप विपरीत परिणाम झाला आहे, असे अलजझीराचे म्हणणे आहे.

दुष्काळाचा परिणाम केवळ प्राण्यांवरच नाही तर लोकांवरही होत आहे. देशातील दुष्काळ व्यवस्थापन प्राधिकरणाने सप्टेंबरमध्ये चेतावणी दिली होती की तीव्र दुष्काळामुळे सुमारे २.१ दशलक्ष केनियन लोक उपासमारीला सामोरे जात आहेत. राष्ट्राध्यक्ष उहुरु केन्याट्टा यांनी सप्टेंबरमध्ये दुष्काळाला राष्ट्रीय आपत्ती घोषित केले होते.

वन्य प्राण्यांना सर्वाधिक धोका

या दुष्काळाचा सर्वाधिक धोका वन्य प्राण्यांना आहे. पाळीव प्राण्यांची काळजी घेतली जात आहे. परंतु, वन्यप्राण्यांची घेतली जात नसल्याने त्यांना दुष्काळाचा सर्वाधिक फटका बसला आहे, असे बोर-अल्गी जिराफ अभयारण्यातील इब्राहिम अली यांनी केनियाच्या न्यूज वेबसाइट ‘द स्टार’ला सांगितले. नदीच्या काठावर शेती केली जात असल्याने जिराफांना पाणी मिळणे बंद झाले आहे, असेही ते म्हणाले. दुष्काळामुळे चार हजार जिराफांचा मृत्यू होण्याचा धोका आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.