PM Narendra Modi: खलिस्तान समर्थकांनी महात्मा गांधींचा पुतळा फोडला; PM मोदींच्या इटली दौऱ्यापूर्वी घृणास्पद कृत्य

PM Narendra Modi Italy Visit: परराष्ट्र मंत्रालयाने देखील इटलीतील महात्मा गांधींच्या पुतळ्याला झालेल्या नुकसानीचा मुद्दा भारताने उपस्थित केला. या प्रकरणी आवश्यक कार्यवाही करण्यात येणार असल्याचे परराष्ट्र सचिवांनी सांगितले.
PM Narendra Modi Italy Visit
PM Narendra Modi Italy Visitesakal
Updated on

केंद्रात तिसऱ्यांदा सत्ता स्थापन केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या (१३ जून) G7 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी इटलीला रवाना होणार आहेत. मात्र मोदींच्या दौऱ्यापूर्वी इटलीला वातावरण तापलं आहे.  खलिस्तान समर्थकांनी इटलीतील महात्मा गांधींच्या पुतळ्याची तोडफोड केली. खलिस्तान समर्थकांनी हरदीप सिंह निज्जरचाही उल्लेख केला आहे.

इटलीत १३ ते १५ जूनपर्यंत जी ७ शिखर परिषद होणार आहे. मात्र खलिस्तान समर्थकांनी घृणास्पद कृत्य केले. या घटनेचे फोटो देखील व्हायरल झाले. महात्मा गांधींचा पुतळा तोडल्यानंतर खलिस्तानी समर्थकांनी निषेधार्थ घोषणाही लिहिल्या आहेत.

परराष्ट्र मंत्रालयाने देखील इटलीतील महात्मा गांधींच्या पुतळ्याला झालेल्या नुकसानीचा मुद्दा भारताने उपस्थित केला. या प्रकरणी आवश्यक कार्यवाही करण्यात येणार असल्याचे परराष्ट्र सचिवांनी सांगितले. तसेच पुतळ्याची दुरुस्ती करण्यात आल्याचे देखील त्यांनी सांगितले.

PM Narendra Modi Italy Visit
Narendra Modi 3.0: शपथ घेताच मोदी सरकार ॲक्शन मोडमध्ये; 'या' 5 कामांवर लक्ष केंद्रित करणार

या वर्षी G7 शिखर परिषद इटलीच्या अपुलिया भागातील बोर्गो एग्नाझिया या लक्झरी रिसॉर्टमध्ये होणार आहे. पंतप्रधान मोदी १३ जून रोजी इटलीला रवाना होतील आणि १४ जूनच्या संध्याकाळी उशिरा परततील.

नरेंद्र मोदी यांच्यासोबत एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ देखील असेल, ज्यात परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, परराष्ट्र सचिव विनय क्वात्रा आणि एनएसए अजित डोवाल यांचा समावेश असेल. G-7 शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान मोदी अनेक द्विपक्षीय बैठका घेणार आहेत. 

PM Narendra Modi Italy Visit
Narendra Modi Varanasi: वाराणसीतून प्रियांका गांधी लढल्या असत्या तर मोदी 3 लाख मतांनी हारले असते; राहुल गांधींचा मोठा दावा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.