US : खलिस्तान समर्थकांकडून सॅन फ्रान्सिस्कोमधील भारतीय दूतावास पेटवण्याचा प्रयत्न; अमेरिकेकडून जाहीर निषेध

सॅन फ्रान्सिस्को फायर डिपार्टमेंटने वेळीच कारवाई करत ही आग शमवली होती.
Khalistan San Francisco
Khalistan San FranciscoeSakal
Updated on

खलिस्तान समर्थकांनी रविवारी सॅन फ्रान्सिस्कोमधील भारतीय दूतावास पेटवण्याचा प्रयत्न केला होता. स्थानिक माध्यमांनी याबाबत वृत्त प्रसिद्ध केले होते. यानंतर आता अमेरिकेने या प्रकाराचा जाहीर निषेध केला आहे. सॅन फ्रान्सिस्को फायर डिपार्टमेंटने वेळीच कारवाई करत ही आग शमवली होती.

एका वृत्तवाहिनीने याबाबतचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. रविवारी पहाटे हा सर्व प्रकार घडल्याचं यात म्हटलं आहे. हा व्हिडिओ खलिस्तान समर्थकांनी शेअर केल्याचं या ट्विटमध्ये म्हटलं आहे. या व्हिडिओत एक व्यक्ती इमारतीला आग लावताना दिसत आहे. खलिस्तानी नेत्यांच्या हत्येचा सूड घेण्यासाठी हे कृत्य केल्याचं यातून दिसून येतंय.

यानंतर अमेरिका सरकारचे प्रतिनिधी मॅथ्यू मिलर यांनी या प्रकाराचा निषेध केला आहे. "सॅन फ्रान्सिस्कोमधील भारतीय दूतावासावर झालेल्या कथित हल्ल्याचा अमेरिका जाहीर निषेध करते. विदेशी संपत्तीचे नुकसान करणे किंवा विदेशी अधिकाऱ्यांवर हल्ला करणे या दोन्ही गोष्टी अमेरिकेत फौजदारी गुन्हा आहे." अशा आशयाचं ट्विट मॅथ्यू यांनी केलं आहे.

Khalistan San Francisco
Avtar Khand: लंडनमध्ये खलिस्तानी झेंडा फडकवणाऱ्या मास्टरमाइंडचा मृत्यू, कारण अस्पष्ट

मार्चमध्येही झाला होता हल्ला

यापूर्वी मार्च महिन्यात देखील खलिस्तान समर्थकांनी सॅन फ्रान्सिस्कोमध्ये भारतीय दूतावासावर हल्ला केला होता. यावेळी खलिस्तान समर्थक घोषणा देत काही आंदोलक दूतावासामध्ये शिरले होते. तसेच, दूतावासाच्या परिसरात त्यांनी खलिस्तानी झेंडेदेखील फडकावले होते.

Khalistan San Francisco
KCF : खलिस्तान कमांडो फोर्सच्या प्रमुखाची पाकिस्तानमध्ये हत्या! सोसायटीमध्ये घुसून झाडल्या गोळ्या

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.