Hindu Temple : खलिस्तान समर्थकांचा हिंदू मंदिरावर पुन्हा हल्ला; देवतांच्या फोटोंची केली तोडफोड

ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन शहरात हिंदू मंदिरावर (Hindu Temple) पुन्हा हल्ला करण्यात आला आहे.
Lakshmi Narayan Temple Brisbane
Lakshmi Narayan Temple Brisbaneesakal
Updated on
Summary

ऑस्ट्रेलियातील मंदिरांवर दोन महिन्यांत हल्ल्याची ही चौथी घटना आहे.

Hindu Temple In Brisbane : ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन शहरात हिंदू मंदिरावर (Hindu Temple) पुन्हा हल्ला करण्यात आला आहे. स्थानिक वृत्तानुसार, शनिवारी मंदिराची तोडफोड करण्यात आली आणि भिंतीवरील देवतांच्या फोटोंचं नुकसान करण्यात आलं.

ऑस्ट्रेलियातील मंदिरांवर दोन महिन्यांत हल्ल्याची ही चौथी घटना आहे. पूजेसाठी मंदिरात आलेल्या भाविकांच्या निदर्शनास ही घटना आली आणि त्यांनी तात्काळ मंदिर समितीला याची माहिती दिली.

ऑस्ट्रेलिया टुडेच्या वृत्तानुसार, ब्रिस्बेनच्या दक्षिणेकडील बरबँक उपनगरातील श्री लक्ष्मी नारायण मंदिराची (Lakshmi Narayan Temple) खलिस्तानी (Khalistani) समर्थकांनी तोडफोड केली आहे. मंदिराजवळ राहणारे रमेश कुमार यांनी सांगितलं की, 'मेलबर्नच्या हिंदू मंदिरांमध्ये काय घडलं हे मला माहीत आहे, परंतु या द्वेषाचा सामना करणं हा एक अतिशय दुःखद अनुभव आहे.'

Lakshmi Narayan Temple Brisbane
Nobel Prize : सरकारविरोधात भूमिका घेणं पडलं महागात; 'नोबेल' विजेते बिलियात्स्कींना 10 वर्षांचा तुरुंगवास!

मंदिर समितीचे प्रमुख सतींदर शुक्ला यांनी ऑस्ट्रेलिया टुडेला सांगितलं की, मंदिराचे पुजारी आणि भाविकांनी सकाळी फोन करून मला तोडफोडीची माहिती दिली. व्यवस्थापन समिती पोलिस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतल्यानंतर सविस्तर निवेदन देऊ, असं शुक्ला यांनी स्पष्ट केलं.

Lakshmi Narayan Temple Brisbane
Sanjay Raut : 'कालची कार्टी शिवसेना संपवायला निघाली आहेत, पण आम्ही आयोगाला चुना मळत बसायला लावणार'

याआधी ब्रिस्बेनमधील गायत्री मंदिरात खलिस्तानी अतिरेक्यांकडून धमकीचा फोन आला होता. ऑस्ट्रेलियन हिंदूंना घाबरवण्यासाठी शिख्स फॉर जस्टिसकडून ही कृत्ये केली जात आहेत, असा आरोप हिंदू मानवाधिकार संचालक सारा एल गेट्स यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.