Khalistani Terrorist Died : खलिस्तानी दहशतवादी लखबीर रोडेचा पाकमध्ये मृत्यू, भारतातील अनेक हल्ल्यांचा होता मास्टरमाईंड

खलिस्तानी दहशतवादी लखबीर सिंग रोडे याचा पाकिस्तानात मृत्यू झाला आहे.
Khalistan
Khalistan Sakal
Updated on

खलिस्तानी दहशतवादी लखबीर सिंग रोडे याचा पाकिस्तानात मृत्यू झाला आहे. लखबीर सिंग रोडे बंदी घालण्यात आलेली संघटना खलिस्तान लिबरेशन फोर्स आणि इंटरनॅशनल सिख यूथ फेडरेशन चा प्रमुख होता. मीडिया रिपोर्टनुसार, लखबीर सिंग रोडे याचा वयाच्या ७२ व्या वर्षी पाकिस्तानात मृत्यू झाला आहे. मृत्यूचे कारण हार्ट अटॅक असल्याचे सांगितले जात आहे.

लखबीर सिंग रोडे हा दहशतवादी जर्नेलसिंग भिंद्रनवाले याचा पुतण्या होता आणि भारताकडून जाहीर करण्यात आलेल्या दहशतवाद्यांच्या यादीत देखील त्याचा समावेश होता. लखबीर सिंह रोडे याचा भाऊ आणि अकाल तख्तचे पूर्वीचे जत्थेदार जसबीर सिंह रोडे याने लखबीर याच्या मृत्यूच्या वृ्त्ताला दुजोरा दिला आहे.

लखबीर सिंग रोडे हा पंजाबच्या मोगा जिल्ह्यातील रोडे गावचा रहिवासी होता. आणि भारतातून फरार होत तो दुबईला गेला, नंतर दुबईहून पाकिस्तानात दाखल झाला. मात्र त्याने स्वतःच्या कुटुंबाला कॅनडामध्ये ठेवलं. २००२ मध्ये भारताने पाकिस्तानला २० दहशतवाद्यांना सोपवण्यासाठी एक लिस्ट दिली होती, त्यामथ्ये लखबीर सिंग रोडे याचं नाव देखील होतं.

भारत सरकारच्या डॉडियरनुसरा, लखबीर सिंग रोडे याला इंटरनॅशनल सिख यूथ फेडरेशनने ब्रिटन, जर्मनी, कॅनडा आणि अमेरिकेसह अनेक ठिकाणी आपल्या शाखा सुरू केल्या होत्या. सोबतच रोडे याच्यावर भारतात बेकायदेशीर पद्धतीने हत्यारं आणि स्फोटक पाठवल्याचे देखील आरोप आहेत.

Khalistan
MP Election : चिप असलेले कोणतीही मशीन हॅक होऊ शकतं; मोठ्या पराभवानंतर माजी मुख्यमंत्र्यांनी EVM वर उपस्थित केले प्रश्न

रोडे याच्यावर स्थानिक गँगस्टर्सच्या मदतीने पंजाबमध्ये अनेक हल्ले केल्याचा आरोप आहे. या वर्षाच्या सुरुवातीला एनआयएने मोगा जिल्ह्यातील लखबीर सिंग रोडे यांच्या मालकीची जमीनही जप्त केली होती. रोडे यांच्यावर भारतात अनेक हल्ल्यांचा कट रचल्याचा आरोप आहे. 15 सप्टेंबर 2021 रोजी पंजाबमधील फाजिल्का येथे टिफिन बॉम्बचा स्फोट झाला. या हल्ल्यामागे लखबीर सिंग रोडेचा हात असल्याचे एनआयएच्या तपासात समोर आले आहे.

पंजाबमध्ये सीमेपलीकडून शस्त्रास्त्रे, दारूगोळा, ड्रग्ज आणि टिफिन बॉम्ब बेकायदेशीरपणे पाठवण्यातही लखबीर सिंग रोडेची महत्त्वाची भूमिका होती. 2021 ते 2023 या वर्षात लखबीर सिंग रोडे सहा दहशतवादी घटनांमध्ये सक्रियपणे सहभागी असल्याचे आढळून आले.

Khalistan
RBI Action: रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई! 'या' बँकेचा परवाना केला रद्द, ग्राहकांच्या पैशांचे काय होणार?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.