कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो (Justin Trudeau) यांनी या घटनेचा निषेध केला आहे.
एका हिंदू मंदिरात भाविकांवर झालेल्या हल्ल्यावरून (Hindu Temple Attack) कॅनडात प्रचंड गदारोळ सुरू आहे. भारतीय वंशाचे खासदार चंद्रा आर्य (Chandra Arya) यांनी कॅनडातील खलिस्तानी अतिरेक्यांच्या हिंसाचाराबद्दल संताप व्यक्त केलाय. कॅनडात अतिरेक्यांना मोकळे सोडले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.