काबूल: काबुलच्या हमीद करझाई आंतरराष्ट्रीय विमातनळावरुन तालिबानने १५० पेक्षा जास्त नागरिकांचं अपहरण केल्याचं वृत्त अफगाणि माध्यमांनी दिलं आहे. अपहरणग्रस्तांमध्ये बहुतांश भारतीय नागरिक असल्याची माहिती आहे. अफगाणिस्तान बाहेर जाण्यासाठी नागरिक काबूल विमानतळावर थांबलेले असताना अपहरणाचा हा प्रकार घडला.
तालिबानचे प्रवक्ते अहमदल्लाह वासेक यांनी अपहरणाचे वृत्त फेटाळून लावले आहे. काबुल विमानतळावरुन आम्ही भारतीयांचं अपहरण केलं नाही. आम्ही दुसऱ्या गेट ने १५० भारतीयांना सुरक्षित एअरपोर्टवर पोहचवलं, असा तालिबानचा दावा आहे.
सूत्राने काय सांगितलं?
हा प्रकार घडला त्यावेळी बातमी देणारा सूत्र विमानतळावर उपस्थित होता. पत्नी आणि अन्य काही जणांसोबत तो तिथून निसटण्यात यशस्वी ठरला. अपहरणग्रस्तांमध्ये काही अफगाणि नागरिक आणि अफगाणि शीख आहेत. पण बुहतांश भारतीय असल्याची त्या सूत्राने माहिती दिली. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.
आठ मिनी व्हॅनमधून ते सर्वजण काबूल विमातळाजवळ पोहोचले होते. पण सहकार्य मिळत नसल्याने त्यांना विमानतळावर आतमध्ये प्रवेश करता आला नाही. सूत्राने सांगितले की, निशस्त्र तालिबानी त्यांच्याजवळ आले. त्यांना मारहाण केली व नंतर काबुलमधील ताराखील येथे घेऊन गेले.
ताराखील येथे नेत असताना सूत्राने व त्याच्या पत्नीने चालत्या गाडीबाहेर उडी मारली व तिथून निसटण्यात यशस्वी ठरले. त्यांच्याप्रमाणेच अजूनही काहीजण निसटले. पण अन्य भारतीयांचे काय झाले ? ते समजू शकलेले नाही, असे त्या सूत्राने सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.