Japan Killer Whales : जपानमध्ये बर्फात अडकलं किलर व्हेल्सचं कुटुंब; बचावासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू.. व्हिडिओ समोर

Japan Orca : या व्हेल्सबद्दल माहिती मिळताच जपान प्रशासनाने तातडीने त्यांना वाचवण्यासाठी पावलं उचलली आहेत. मात्र, बर्फामुळे त्यांच्यापर्यंत पोहोचणं अवघड झालं आहे.
Trapped Killer Whales
Trapped Killer WhaleseSakal
Updated on

Trapped Killer Whales : जपानच्या उत्तरी भागात असणाऱ्या होक्काइडो शहराजवळ सुमारे 13 किलर व्हेल्सचा एक समूह बर्फात अडकला आहे. या माशांच्या चारही बाजूंनी बर्फ असल्यामुळे त्यांचा बचाव करणं शक्य होत नाहीये. पाण्याच्या आतमध्येही मोठ्या प्रमाणात बर्फ असल्यामुळे त्या बाजूने देखील त्यांच्यापर्यंत पोहोचणं अशक्य असल्याचं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

या व्हेल्सचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. स्थानिक मासेमारांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हेल्सबद्दल माहिती मिळताच जपान प्रशासनाने तातडीने त्यांना वाचवण्यासाठी पावलं उचलली आहेत. मात्र, बर्फामुळे त्यांच्यापर्यंत पोहोचणं अवघड झालं आहे. या माशांच्या भोवती एक किलोमीटर लांबीपर्यंत बर्फाचा थर पसरला आहे.

बचावकार्य कशामुळे अवघड?

या समुद्रात बर्फाचा थर सगळीकडे सारखा नाही. पाण्याच्या वर जेवढा दिसत आहे, त्यापेक्षा अधिक बर्फ पाण्याच्या खाली आहे. त्यामुळे व्हेलपर्यंत पोहोचणं आणि त्यांना वाचवून परत आणणं खूपच जोखमीचं आहे. बर्फाचं हे जाळं तोडणं अतिशय अवघड काम आहे. आता संशोधक थोडंफार तापमान वाढण्याची वाट पाहत आहेत, जेणेकरून बर्फ वितळेल आणि बचावकार्य पुढे नेता येईल.

Trapped Killer Whales
Scientists Talk To Whale : शास्त्रज्ञांनी चक्क व्हेलशी मारल्या गप्पा; आता एलियन्सशी संवाद साधताना होणार संशोधनाचा फायदा

संपूर्ण परिवार अडकलं

टोकियो युनिवर्सिटीचे संशोधक प्रा. मारी कोबायाशी यांनी सांगितलं, की किलर व्हेल्स (ओर्का) या समूहाने राहणारी माशांची प्रजाती आहे. हे आपल्या साथीदाराला किंवा मुलांना सोडून जात नाहीत. या सर्वांना वेळेत वाचवणं गरजेचं आहे. अन्यथा, एका जरी माशाला बाहेर जाता येत नसेल, तरी सगळेच तिथे थांबतील आणि सर्वांचा जीव जाईल.

2005 च्या पुनरावृत्तीची भीती

यापूर्वी 2005 सालीदेखील जपानमध्ये अशाच प्रकारची घटना घडली होती. यावेळी सुमारे डझनभर व्हेल मासे असेच बर्फात अडकले होते. बचाव पथक त्यांच्यापर्यंत पोहोचेपर्यंत त्यातील बहुतांश माशांचा बळी गेला होता. या दुर्दैवी घटनेची पुनरावृत्ती आता होऊ नये अशीच सर्वांची आशा आहे.

Trapped Killer Whales
Tibet Glacier Virus : तिबेटमधील ग्लेशिअर वितळले अन् बाहेर आले हजारो वर्षांपूर्वीचे विषाणू.. भारताला मोठा धोका?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.