King Charles Coronation : राजा चार्ल्स तिसरा याच्या राज्याभिषेकाची तयारी ब्रिटनमध्ये जोरात सुरू आहे . लंडनमध्ये ६ मे रोजी राज्याभिषेक होणार आहे. किंग चार्ल्स आणि राणी कॅमिला यांचा शनिवारी वेस्टमिन्स्टर अॅबे आयोजित कार्यक्रमात राज्याभिषेक होणार आहे .
ब्रिटनमध्ये 70 वर्षांनंतर राज्याभिषेक होणार आहे . ही शाही परंपरा अखेरची 1953 मध्ये दिवंगत राणी एलिझाबेथ यांच्यासाठी पार पडली होती. या राज्याभिषेक कार्यक्रमासाठी ६ मे ही तारीख का निवडली हा प्रश्न आहे. खरे तर त्याचा संबंध राजघराण्याशी आहे.
६ मे ही तारीख निवडली त्यामागची दोन मोठी कारणे
पहिले कारण : राजघराण्याने राज्याभिषेकासाठी ६ मे ही तारीख निवडली आहे, याचे नेमके कारण त्यांनी दिलेले नसले तरी दोन मोठी कारणे स्पष्टपणे समजतात. 6 मे हा चार्ल्सचा नातू आर्ची हॅरिसनचा वाढदिवस आहे. आर्ची हा प्रिन्स हॅरी आणि मेघन मार्कल यांचा मुलगा आहे. त्याचा जन्म 6 मे 2019 रोजी झाला. हे राज्याभिषेक तारखेमागील कनेक्शन देखील असू शकते.
दुसरे कारण: या तारखेचे कनेक्शन केवळ आर्ची हॅरिसनपुरते मर्यादित नाही. याचे आणखी एक कारण म्हणजे राजा एडवर्ड सातवा. 6 मे 1910 रोजी बकिंगहॅम पॅलेस येथे त्यांचे निधन झाले. राजा एडवर्ड सातवा 1901 ते 1910 पर्यंत ब्रिटनचे राजे होते. त्यांच्या कारकिर्दीला एडवर्डियन युग म्हणतात. त्यामुळेच राज्याभिषेकासाठी निवडलेली तारीख राजघराण्यासाठी खास असते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.