वर्ष 2023 हे अखेर संपले असून 2024 या नव्या कोऱ्या वर्षाला सुरूवात झाली आहे. नव्या वर्षाचे जगभरात जल्लोषासह स्वागत करण्यात आले. एकीकडे मागचं वर्षा काही देशांसाठी युद्धाचं वर्ष ठरलं, तर काही देशांनी वेगवेगळ्या क्षेत्रात मोठं यश मिळवल्याचं पाहायला मिळालं. आता 2024 मध्ये काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नव्या वर्षात का घडामोडी घडणार याबद्दल अंदाज व्यक्त केले जात आहेत.
नवीन वर्षाची काय वाढून ठेवलंय याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांच्या मनात असतो, चला तर मग जाणून घेऊयात की 16 व्या शतकातील फ्रान्सचा ज्योतिषी नास्त्रेदमस यांने 2024 साठी काय म्हटले आहे.
किंग आणि पोप बदलणार का?
2024 साली नवे पोप जगाला भेटतील, असे भाकीत नास्त्रेदमस यांने केले होते. पोप फ्रान्सिस हे जग सोडून जाऊ शकतात, असेही बोलले जात होते. किंग चार्ल्सच्या जागी असा कोणीतरी येईल ज्याला राजा होण्याबद्दल काहीही माहिती नसे , असे त्याने भाकीत केले होते. आता यामुळे प्रिन्स हॅरी ही जागा घेऊ शकतो अशी शक्यता व्यक्त होत आहे.
मात्र, नवा राजा प्रिन्स हॅरी असेल की आणखी कोणी, याबाबत सध्या तरी कोणतेही संकेत मिळालेले नाहीत. विशेष म्हणजे नास्त्रेदमसने राणी एलिझाबेथच्या मृत्यूची अचूक भविष्यवाणी केली होती.
चीन गुडघे टेकणार?
नास्त्रेदमसनेही समुद्रातील युद्धाची भविष्यवाणी केली होती. त्यांच्या मते चीन हिंदी महासागरात कहर करेल, ज्यामुळे युद्ध होईल. मात्र, काही रीपोर्ट्नुसार तज्ज्ञ सांगत आहेत की, अशा परिस्थितीत चीनला पराभवाला सामोरे जावे लागू शकते. याशिवाय 2024 मध्ये पृथ्वीवर दुष्काळ आणि पूर वाढण्याची शक्यताही त्याने वर्तवली आहे.
जगभरात नवीन वर्षाचं स्वागत
जगभरात लोकांनी जोरदार फटाक्यांची आतषबाजी आणि आनंदाने नववर्षाचे स्वागत केले. न्यूझीलंडमधील ऑकलंड मध्ये सर्वप्रथम नववर्षाचे सेलिब्रेशन करण्यात आले. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी लोक रस्त्यावर उतरल्याचे देखील पाहायाला मिळाले. तसेच रेस्टॉरंट, पब, डिस्को, सार्वजनिक ठिकाणी पार्ट्या करत लोक सेलिब्रेशन करताना दिसले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.