'वर्ल्ड कार-फ्री डे' का साजरा केला जातो? काय आहे महत्व?

वर्ल्ड कार-फ्री डे
वर्ल्ड कार-फ्री डेGoogle
Updated on

'जागतिक कार-फ्री डे' दरवर्षी 22 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. हा दिवस मुख्यतः सायकलिंग, सार्वजनिक वाहतूक वापरणे तसेच चालण्याच्या फायद्यांविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने साजरा केला जातो. या दिवसानिमीत्ताने जगभरातील वाहनचालकांना या एका दिवसासाठी खासगी कार वापरास सुट्टी देण्याचे आवाहन करण्यात येते. जगभरातील अनेक शहरांमध्ये कार फ्री डे चे आयोजन करण्यात येते आणि लोक त्यांच्या कार घरीच सोडून त्याऐवजी चालणे किंवा सायकलींग करतात.

उद्देश काय आहे?

जागतिक कार फ्री डे साजरा करण्यामागचा उद्देश काय आहे? हा दिवस सर्वांना विशेषत: कार मालकांना ट्रेन, बस, सायकल, मेट्रो किंवा चालणे यासारख्या माध्यामांचा वापर करावा आणि एक दिवस कार चालवू नयेत यासाठी तसेच वर्षातील एक दिवस वाहने रस्त्यांवर नसल्याचा परिणाम काय होतो, तसेच रस्त्यांवर कमी झालेली वाहनांच्या संख्येमुळे शहरे कशी दिसू शकतील हे दाखवण्याचा एक प्रयत्न आहे. तसेच या दिवसाचा मुख्य उद्देश हे त्या त्या शहरांमधील कार वापरामुळे होणारे ध्वनी आणि वायू प्रदूषण कमी करून पर्यावरणाचे रक्षण करणे हा आहे.

जागतिक कार फ्री डे मागचा इतिहास

खरं तर, जागतिक कार-फ्री डे 1990 च्या दशकात अनौपचारिकपणे साजरा केला जात होता, परंतु पहिला अधिकृत जागतिक कार-फ्री डे हा 2000 मध्ये सुरू करण्यात आला. तेव्हापासून या दिवशी जगभरातील मोठ्या शहरांमधील मुख्य रस्ते गाड्यांसाठी बंद्द करण्यात येतात. तसेच जगभरातील अनेक शहरात वेगवेगळ्या लहान-मोठे कार्यक्रम आयोजित केले जातात.

कारणे काय आहेत?

हवा प्रदुषण हे देशच नाही तर जगभरात एक मोठी समस्या बनली आहे, हा दिवस साजरा करण्याचा मुख्य उद्देश लोकांना सार्वजनिक वाहतूक माध्यमे तसेच सायकल सारख्या पर्यायांचा वापर करण्यासाठी प्रोत्साहन देणे हा आहे. जगभरात वापरण्यात येणारी खासगी वाहने वातावरणात वायू उत्सर्जनाचे प्रमाण वाढवतात. जेव्हा लोक सार्वजनिक वाहतूक वापरतात आणि आपल्या खाजगी कार घरीच सोडतात, तेव्हा रस्त्यांवरील कारच्या कमी संख्येमुळे वातावरणातील प्रदूषण देखील कमी होते. इतकेच नाही तर यामुळं रस्त्यांवर ट्रॅफिक जाम देखील कमी होतो. ज्यामुळे प्रत्येकासाठीच प्रवास सोयीस्कर होतो.

कार फ्री डे लोकांना आरोग्यदायी जीवनशैली स्विकारण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी साजरा केला जातो. कार चालवण्याऐवजी सायकल चालवणे किंवा पायी चालण्याचे चांगल्या आरोग्याठी फायदेशीर आहे या सवयींनी प्रोत्साहीत करण्यासाठी या दिवसाची मदत होते. तसेच चालण्याचा थेट फायदा हा आपल्या स्नायूंची शक्ती वाढवण्यासाठी तर होतोच सोबतच गाडी न वापरल्याने वायू प्रदूषणाचा सामना करण्यास देखील यामुळे मदत होते. कारने बरेच एक्झॉस्ट बाहेर टाकले जातात ज्यामुळे हवा प्रदूषित होते पण सायकल चालवल्याने किंवा पायी चालल्याने याउलट आपल्या स्नायू शक्तीचा वापर तर होतोच सोबतच आपण आपल्या कॅलरी बर्न होतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.