इटलीच्या रस्त्यावर भारतीय पुरुषाचा 'साडी-टिकली' अवतार; पाहा फोटो
एक काळ होता जेव्हा कोणी कोणते कपडे वापरायचे हे लिंगानुसार निश्चित केले जात होते. पण आता काळ बदलला आहे. आजकाल मुली पुरुषांप्रमाणे कपडे परिधान करु लागल्यात. अगदी तसेच काही पुरुषही आता स्त्रियांसारखे कपडे परिधान करत असल्याचे दिसू लागले आहे. हॅरी स्टाइल्स, रणवीर सिंग आणि के-पॉप बँड BTS यांसारख्या स्टार्सनी जाहिरपणे असे कपडे ही फॅशन रुढ केल्याचं दिसतं. तथापि, काहीजणांनी लोकांच्या नजरेपासून दूर राहून एंड्रोजिनस फॅशन रुजवण्याची एकप्रकारे क्रांतीच सुरू केली. इंटरनेटवरही या गोष्टीचा प्रचंड बोलबाला होताना दिसत आहे.

काळ्या रंगाची साडी नेसून त्यावर कोट घातलेले स्वतःचे काही फोटो सेनने फेसबुकवर शेअर केले. त्याने ठळक लाल बिंदी आणि हटके सनग्लासेसही घातले आहेत. तसेच त्याने लिपस्टिक लावल्याचंही दिसत आहे. त्याचा हा संपूर्ण लूक आणि त्याचा आत्मविश्वास पाहून नेटकरीही थक्क झाले.
“साडीतला माणूस असणं मला कुठेही फिरण्यापासून रोखू शकणार नाही, असं सेन म्हणाला. या पोस्टला त्याने कॅप्शन दिले होतं, ‘जगातील प्रमुख फॅशन कॅपिटलपैकी एकाच्या रस्त्यावर कोण फिरत आहे?’
या पोस्टवर नेटिझन्सच्या अनेक प्रतिक्रिया आणि आश्चर्यचकित टिप्पण्या नोंदवल्या आहेत. काहींनी सेन किती हटके दिसत आहे, हे व्यक्त केले, तर काहींनी त्याच्या शिष्टाईचं कौतुक केलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.