Video: 'लोभी मालकामुळे कुवेतमध्ये 40 भारतीयांचा बळी'; इमारतीची मालकी मल्याळी कंपनीकडे, दुर्घटनेचा व्हिडिओ समोर

Kuwait fire tragedy: कुवेतमधील अपघातात ४० भारतीयांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येतंय. एकूण ४९ जणांचा मृत्यू झालाय.
Kuwait fire
Kuwait fire
Updated on

कुवेत सिटी : कुवेतमधील अल अहमदी जिल्ह्यातील मंगाफ शहरातील कामगारांच्या इमारतीमधील अग्नितांडवानंतर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. उपपंतप्रधान आणि अंतर्गत सुरक्षामंत्री शेख फहाद अल युसूफ अल सबाह यांनी या दुर्घटनेसाठी कंपनी आणि इमारतीच्या मालकाची हावच कारणीभूत असल्याचा आरोप केला आहे.

कुवेतमधील अपघातात ४० भारतीयांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येतंय. एकूण ४९ जणांचा मृत्यू झालाय. मोदींनी याप्रकरणी तात्काळ बैठक बोलावली असून पीडितांच्या कुटुंबियांना २ लाख रुपयांची घोषणा करण्यात आली आहे.

या दुर्घटनेतील मृतांमध्ये केरळ, तमिळनाडूमधील कामगारांचा समावेश असल्याची भीती व्यक्त होऊ लागली असून दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आपआपल्या यंत्रणांच्या माध्यमातून माहिती गोळा करायला सुरूवात केली आहे. राज्य सरकारे केंद्र सरकारच्या संपर्कामध्ये आहेत.

केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांनी मृतांमध्ये केरळी नागरिकांचा समावेश असू शकतो अशी भीती वर्तविली असून तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी जखमी तमिळी नागरिकांना तातडीने मदत दिली जावी, अशी आग्रही भूमिका घेतली आहे. इमारतीमध्ये आग लागली होती ती इमारत 'एनटीबीसी' या उद्योगसमूहानेच भाडेतत्त्वावर दिली होती. हा उद्योगसमूहमल्याळी उद्योगपती के.जी. अब्राहम यांच्या मालकीचा आहे.

आखाती देशामध्ये रोजगाराच्या शोधात

निमित्ताने जाणारे बहुसंख्य कमी वेतन असलेले कामगार येथेच वास्तव्यास येत असत अशी माहिती समोर आली आहे. " प्रॉपर्टी डिलर हे केवळ त्यांचा फायदा पाहतात, कामगारांच्या सुरक्षेकडे मात्र त्यांचे दुर्लक्ष होते. त्यांच्या लोभीपणामुळे अशा दुर्घटना घडतात. आता आम्ही सर्व प्रॉपर्टी डिलरसोबत बैठक घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. ज्या इमारतींमध्ये नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याचे दिसते त्या तातडीने पाडण्याचे निर्देश नगर प्रशासनाला देण्यात येतील,” असे सबाह यांनी नमूद केले.

या दुर्घटनेनंतर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, वरिष्ठ नेते राहुल गांधी आणि पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वद्रा यांनीही शोक व्यक्त केला. दरम्यान, या दुर्घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीने उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची बैठक बोलावत परिस्थितीचा आढावा घेतला.

Kuwait fire
Kuwait Building Fire : कुवेतमध्ये अग्नितांडव; ४९ मृतांमध्ये बहुतांश भारतीय

घटनेसंबंधी अपडेट

■ पंतप्रधान मोदींकडून घटनेचा

आढावा

■ भारतीय राजदूत दुर्घटनास्थळी दाखल

■ भारतीय दूतावासाकडून हेल्पलाइन जारी

■ जखमींच्या प्रकृतीवर सरकारचे बारीक लक्ष

■ मंत्री कीर्तिवर्धनसिंह कुवेतला रवाना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.