नवी दिल्ली- तैवानमधील सत्ताधारी डेमोक्रेटिक प्रोगेसिव्ह पार्टीचे Democratic Progressive Party (DPP) नेता लाई चिंग-ते यांनी शनिवारी अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली आहे. विशेष म्हणजे लाई चिंग-ते हे कट्टर चीन विरोधक समजले जातात. ते एका स्वतंत्र आणि लोकशाही देशाचे समर्थन करतात. त्यामुळे चीनसाठी हा मोठा धक्का आहे.
बिजिंगने याआधीच लाई चिंग ते यांना धोकादायक विभाजनवादी नेता ठरवलं आहे. सध्या उपाध्यक्ष असलेले लाई चिंग ते यांच्यासमोर दोन प्रतिस्पर्धी होते. सर्वात मोठ्या विरोक्षी पक्षाचे होऊ यू इह आणि माजी तैयपैई महापौर को वेन जे या दोघांचा त्यांनी पराभव केला आहे. लाई चिंग ते यांनी निवडून आल्यानंतर देशाच्या सुरक्षेबाबत कटिबद्ध असल्याची भावना व्यक्त केली आहे.
चीन आणि तैवान यांच्यामधील तणाव सर्वज्ञात आहेत. चीनने कायमच तैवानवर आपला अधिकार प्रस्थापित करु पाहिला आहे. त्यादृष्टीने चीनची आक्रमक भूमिका पाहायला मिळते. या दोन देशात युद्धाची ठिणगी पडल्यास ती तिसऱ्या महायुद्धाची नांदी असेल असाही काहीजण अंदाज लावतात. (Lai Ching te labelled as China troublemaker wins Taiwan Presidential elections)
लाई तिंग ते यांच्या विजयासह त्यांच्या डेमोक्रेटिव्ह प्रोग्रेसिव्ह पार्टीने सलग तिसऱ्यांदा विजय मिळवत इतिहास रचला आहे. या घडामोडीमुळे चीन आणि तैवान मधील तणाव आणखी वाढण्याची भीती आहे. तैवानला चीन आणि अमेरिकेमध्ये संबंध प्रस्थापित करताना नेहमीच तारेवरची कसरत करावी लागली आहे.
तैवान चीनच्या दक्षिण पूर्व भागात १०० मैल दूर म्हणजे जवळपास १६० किलोमीटर अंतरावरील एक छोटे बेट आहे. परदेशी शक्तींपासून मुक्त झाल्यानंतर १९४९ पासून तैवान स्वत:ला स्वतंत्र देश मानत आला आहे. मात्र, आतापर्यंत जगातील केवळ १४ देशांनी त्याला स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिली आहे.
चीन तैवानला आपला अविभाज्य भाग समजतो. चीन अद्यापही अखंड चीनची स्वप्ने पाहतो. एक दिवस तैवान आपला भाग होईल असा विश्वास चीनला आहे. त्यादृष्टीने आक्रमक प्रयत्न देखील चीनचे सुरु असतात. पण, तैवानचे लोक स्वत:ला स्वतंत्र ठेवू पाहतात. त्यांचे स्वत:चे संविधान आहे आणि नियमित निवडणुकाही होतात. (Latest Marathi News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.