भारतात गेल्या काही दिवसात अशा काही घटना घडल्या होत्या. ज्यामध्ये उच्चभ्रू कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली होती. याच कारण होतं, त्यांना स्वत:चे खाजगी जीवन व ऑफिसमधील काम यामध्ये समतोल साधता येत नव्हता. पण, जर्मनीतील लँड हिअर मोहिम नव्या तरूणांना अशा संकटात एकटी सोडत नाही. ती तरूणांच्या गरजा समजून घेऊन त्यांना नोकरीची संधी देते.
भारतातील तरूणांचं स्वप्न असतं की, उच्च शिक्षण घ्यावं अन् नोकरीसाठी जर्मनीसारख्या देशात जावं. लग्न करून तिकडेच सेटल व्हावं. हे स्वप्न गेली कित्तेक वर्ष द लँड हिअरच्या माध्यमातून
सत्यात उतरत आहे. ही मोहीम तरूणांना नव्या संधी देण्यासाठीच तयार केली गेली आहे.
अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
जगातील मोठ्या अर्थव्यवस्थांपैकी एक, उत्तम कामाचे वातावरण आणि अनेक जागतिक कंपन्यांचे माहेरघर असणारे जर्मनी आपल्या वेगाने वाढणाऱ्या ऑटोमोबाईल, मेकॅनिकल इंजिनीअरिंग, केमिकल आणि आयटी क्षेत्रात काम करण्यासाठी भारतीय गुणवंतांना बोलवीत आहे.
बाडेन-वुटेम्बर्ग आपल्या 'सायबर व्हॅली' आणि नवीनतम इनोव्हेशन पार्कद्वारे आर्टिफिशिअल इन्टेलिजन्स या तंत्रज्ञानासोबत जर्मनीमधील 'एआय'ची कर्मभूमी ठरत आहे. त्यामुळेच भारतीयांची पसंती जर्मनीसारख्या देशाला मिळत आहे.
अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
या नवीन संधींविषयी बोलताना स्टॅगमन सांगतात, "जागतिक बाजारपेठेत काम करण्याची उत्तम संधी तुम्हाला बाडेन-वुटेम्बर्ग आणि जर्मनीमध्ये मिळेल.
लॅंड हिअरमध्ये कामासोबतच कर्मचाऱ्यांच्या खाजगी जीवनाबद्दलही मार्गदर्शन केले जाते. कर्मचाऱ्यांचे उत्तम राहणीमान आणि विविध मनोरंजनाच्या साधनांमुळे जगणे सुसह्य होते. तसेच ब्लॅक फॉरेस्ट' आणि कॉन्स्टन्स तलावालगत असणाऱ्या निसर्गरम्य वातावरणात काम करण्याने जीवनातील ताण-तणाव दूर होतात.
अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
सांस्कृतिक परंपरां लाभलेल्या ठिकाणी आपले आयुष्य सुखासमाधानाने जगण्याची संधी भारतीय उमेदवारांसाठी लँड हिअरने खुली केली आहे."
या मोहिमेबद्दल बाडेन-वुटेम्बर्गचे मुख्यमंत्री फ्लोरिन स्टॅगमन म्हणतात की, उद्योग, शिक्षण, संशोधन आणि सांस्कृतिक देवाण-घेवाण या क्षेत्रांत भारत आणि बाडेन-वुटेम्बर्ग यांनी भरीव कामगिरी केलेली आहे. येथील अनेक कंपन्या आज भारतातही कार्यरत आहेत. आता आम्ही भारतीयांना आणि त्यातही महाराष्ट्रीय नागरिकांना येथे काम करण्यासाठी थेट आमंत्रित करीत आहोत.
अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
नैऋत्य जर्मनीतील बाडेन-वुटेम्बर्ग येथील 'द लँड' या प्रकल्पात नोकरी-व्यवसाय करण्याची सुवर्णसंधी भारतीय प्रज्ञावंतांना आणि कुशल मनुष्यबळाला चालून आली आहे. जागतिक पातळीवरील सर्वोत्तम कंपन्या येथे कार्यरत असून, 'लँड हिअर' या मोहिमेद्वारे अधिकाधिक भारतीयांना, विशेषतः महाराष्ट्रीय नागरिकांना 'द लँड' येथे काम करण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.