Mumbai Attacks : 26/11 चा हल्ल्याचा कट रचणारा दहशतवादी अब्दुल सलाम भुट्टावीचा मृत्यू

दहशतवादाला आर्थिक मदत केल्याप्रकरणी तो बराच काळ पाकिस्तानच्या तुरुंगात शिक्षा भोगत होता
Mumbai Attacks
Mumbai Attacksesakal
Updated on

मुंबईमधील 26/11ला झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा कट रचणारा कुख्यात दहशतवादी अब्दुल सलाम भुट्टावीचा मृत्यू झाला आहे. अब्दुल सलाम भुट्टावी हा पाकिस्तानच्या तुरुंगामध्ये होता. लष्कर-ए-तोएबा दहशतवादी संघटनेचा दहशतवादी आणि हाफिज सईदचा जवळचा सहकारी अब्दुल सलाम भुट्टावी याचा पाकिस्तानच्या तुरुंगात हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू झाल्याची माहिती पाकिस्तानी मीडिया रिपोर्टमधून समोर आली आहे. (Latest Marathi News)

कुख्यात दहशतवादी अब्दुल सलाम भुट्टावी हा 78 वर्षांचा होता. अब्दुल सलाम भुट्टावी 2020 पासून टेरर फंडीग प्रकरणी म्हणजेच दहशवतवादाला आर्थिक खतपाणी घातल्याच्या आरोपाखाली पाकिस्तानच्या तुरुंगात शिक्षा भोगत होता.(Latest Marathi News)

Mumbai Attacks
Gautami Patil: '...तर मी ऐकून घेणार नाही', गौतमी पाटीलचा घनश्याम दरोडेला इशारा

संयुक्त राष्ट्र संघाकडून 2012 मध्ये, अब्दुल सलाम भुट्टावीला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आलं होतं. त्यानंतर दहशतवादाला आर्थिक मदत केल्याच्या प्रकरणात पाकिस्तानमध्ये अटक करण्यात आली होती. ऑगस्ट 2020 मध्ये अब्दुल सलाम भुट्टावीला 16 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. तेव्हापासून तो पाकिस्तानच्या तुरुंगात कैद होता.(Latest Marathi News)

Mumbai Attacks
Crime news : बहिणीला आक्षेपार्ह मॅसेज करून फोटो व्हायरल करणाऱ्या युवकाची भावाकडून हत्या

2008मध्ये मुंबईमध्ये झालेल्या 26/11च्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदच्या अटकेनंतर अब्दुल सलाम भुट्टावीने 2002 आणि 2008 मध्ये लष्कर-ए-तोएबाचा कार्यकारी प्रमुख म्हणून काम पाहिलं होतं. लष्करशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भुट्टावीचा सोमवारी रात्री उशिरा मृत्यू झाला. भुट्टावीचं सोमवारी दुपारी पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील शेखपुरा तुरुंगात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे.(Latest Marathi News)

Mumbai Attacks
Nagpur : OBC कार्यकर्त्यांच्या शिबिराला शरद पवार यांच्यासह अजित पवार हेसुद्धा उपस्थित राहणार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()