Joe Biden: अमेरिकेकडून रासायनिक शस्त्रांचा शेवटचा साठा नष्ट, बायडेन यांची घोषणा

महायुद्धातील संहारक शस्त्रे इतिहासजमा
US chemical weapons destroyed
US chemical weapons destroyed
Updated on

रिचमंड (अमेरिका) : अमेरिका आता रासायनिक शस्त्र मुक्त देश ठरला आहे. प्यूब्लो, कोलोराडोतील प्यूब्लो केमिकल डेपो आणि रिचमंड, केंटकी येथील ब्लू ग्रास आर्मी डेपो (बीजीएडी) येथे रासायनिक शस्त्रांचा शिल्लक साठा नष्ट करण्यात आला. यासंदर्भातील घोषणा संसदेतील रिपब्लिकनचे नेते मिच मॅककॉनेल यांनी जाहीर केले. महायुद्धातील महासंहारक रासायनिक शस्त्रे नष्ट करताना आज शेवटचा साठा निकाली काढल्याने एक पर्व संपले आहे.

जगाला रासायनिक शस्त्रांपासून मुक्त करण्यासाठी १९९७ पासून जागतिक पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. रशियाने २०१७ मध्ये आपल्याकडील सर्व रासायनिक शस्त्रे नष्ट केली. काल अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी केंटुकी येथील ब्लू ग्रास आर्मीने आपल्या साठ्यातील अनेक दशकांपासून असलेल्या रासायनिक शस्त्रांचा साठा नष्ट केल्याचे जाहीर केले.

अमेरिकेने गेल्या सात दशकांपासून त्याचा साठा केला होता. ही शस्त्रे नष्ट करण्यासाठी अमेरिकेला तीन लाख कोटी रुपये खर्च करावे लागले आहेत. हा साठा जवळपास ३० हजार टन एवढा होता. भारताने देखील आपल्याकडील रासायनिक शस्त्रे नष्ट केली आहेत.

दरम्यान, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री ॲटनी ब्लिंकन यांनी ट्विट करत अमेरिकेतील रासायनिक शस्त्राचा साठा यशस्वीरीत्या नष्ट केल्याचे जाहीर केले. हे एक मोठे पाऊल असल्याचे म्हटले आहे. यादरम्यान, सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल ॲड प्रिव्हेंशनने अमेरिकेतील रासायनिक शस्त्रांचा साठा हा १९६८ पर्यंत सुमारे ४० हजार टनपर्यंत पोचल्याचे म्हटले होते. पण आता हा साठा नष्ट झाल्याने गंभीर चिंतेतून मुक्तता मिळाली आहे, असे मॅककोनेल यांनी म्हटले आहे.

US chemical weapons destroyed
Super Women : हीच ती सुपर वूमन! 74 वर्षांच्या नोकरीत एका दिवसाचीही रजा नाही अन् नव्वदीत घेतली रिटायरमेंट..

असे नष्ट केले शस्त्र

अमेरिकेने सुरवातीला रासायनिक शस्त्रे समुद्रात फेकून देण्याचा विचार केला होता. मात्र या कृतीला नागरिकांनी तीव्र विरोध केला. त्यामुळे त्यांना हा निर्णय परत घ्यावा लागला. आता रासायनिक शस्त्रे नष्ट करण्यासाठी रोबोटिक मशीनची मदत घेतली. या मशिनच्या मदतीने शस्त्रांना कपाटात खुले करून, त्यांच्यातील द्रव्य बाहेर काढले आणि धुवून काढत १५०० अंश सेल्सिअस फारेनहाईटवर जाळून टाकले.

रासायनिक शस्त्र विरोधी संघटना (ओपीसीडब्लू)चे प्रमुख फर्नांडो एरियस म्हणाले, की अमेरिकेने जाहीर केलेला रासायनिक शस्त्रांचा साठा यशस्वीपणे नष्ट करणे हा एक मैलाचा दगड आहे. शांततेचा नोबेल पुरस्कार विजेत्या या संघटनेने म्हटले, अमेरिकेने साठा नष्ट केला असला तरी अलीकडच्या काळात रासायनिक शस्त्रांचा होणारा वापर पाहता जगाने सावध राहणे गरजेचे आहे.

अमेरिकेने घोषित केलेल्या रासायनिक शस्त्रांचा शेवटचा साठा नष्ट केला आहे. जागतिक महायुद्धात मोठ्या प्रमाणात वापरण्यात आलेल्या शस्त्रांना नष्ट करण्यासाठी गेल्या अनेक दशकांपासून सुरू असलेल्या प्रयत्नांचा आज शेवट झाला.३० सप्टेंबर २०२३ पर्यंत रासायनिक शस्त्रांचा साठा संपविणे गरजेचे होते आणि ते आश्‍वासन अमेरिकेने पूर्ण केले आहे.
ज्यो बायडेन, अध्यक्ष

US chemical weapons destroyed
Horrible Crime : बायकोची हत्या करून खाल्ला मेंदू, कवटीचा बनवला अ‍ॅशट्रे! किळसवाणा प्रकार समोर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.