जीनिव्हा - संघर्ष, छळवणूक आणि मानवी हक्कांचे उल्लंघन आदी कारणांमुळे गतवर्षी जगभरातील सुमारे ११ कोटी नागरिकांवर निर्वासित होण्याची वेळ आल्याचे संयुक्त राष्ट्रांच्या निर्वासितांसंदर्भातील यंत्रणेचे उच्चायुक्त फिलिप्पो ग्रँडी यांनी म्हटले आहे.
एकट्या सुदानमधून युद्धामुळे गतवर्षीच्या एप्रिल महिन्यापासून दोन कोटी नागरिक निर्वासित झाले आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या निर्वासितांसंदर्भातील उच्चायुक्तांच्या २०२२ मधील जागतिक स्थितीबाबतच्या अहवालाच्या प्रकाशनाच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. गतवर्षीचा विचार करता एक कोटी ९० लाख नागरिकांना जबरदस्तीने विस्थापित व्हावे लागले. रशियाच्या आक्रमणानंतर एक कोटी १० लाख नागरिक रशिया आणि अन्य ठिकाणी स्थलांतरित झाले. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळातील हे जगातील सर्वांत मोठे आणि जलदगतीने झालेले स्थलांतर होते, असेही त्यांनी सांगितले.
‘या घटना त्या आधीच्या काळापेक्षा तीन ते चार पटीने अधिक होत्या. त्यावेळी माध्यमांमध्ये चर्चा होत नसे. मात्र, ज्यावेळी सुदानमधून परदेशातील नागरिकांना स्थलांतरित व्हावे लागले, तेव्हा त्याची अनेक वर्तमानपत्रांनी दखल घेतली.’ असे फिलिप्पो ग्रँडी यावेळी म्हणाले.
बोट उलटून ३२ जणांचा मृत्यू
अथेन्स - ग्रीकच्या दक्षिण भागात समुद्रात स्थलांतरीतांना बेकायदा पद्धतीने घेऊन जाणारी बोट उलटल्याने किमान ३२ जणांचा मृत्यू झाला. लीबियामधील सुमारे दीडशे जणांना घेऊन ही बोट इटलीच्या दिशेने जात असताना हा अपघात घडला. बोट उलटताच ग्रीकच्या तटरक्षक दलांनी तातडीने मदतकार्य सुरु करत १०४ जणांना वाचविले. बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्यासाठी हेलिकॉप्टरचाही वापर केला जात आहे.
यांनी दिला आधार
बहुतांश निर्वासितांनी आपल्या देशातच आश्रय घेतला
एक तृतीयांश म्हणजेच तीन कोटी ५० लाख निर्वासितांना दुसऱ्या देशांत जावे लागले
बहुतांश निर्वासितांना आशिया, आफ्रिकेतील अल्प, मध्यम उत्पन्न गटांतील देशांनी सांभाळले
युरोप, अमेरिकेतील श्रीमंत देशांचा यामध्ये अत्यल्प सहभाग
निर्वासित दृष्टिक्षेपात...
तुर्कीत सर्वाधिक तीन कोटी ८० लाख दाखल; यात सीरियातील नागरिकांची संख्या अधिक
इराणमध्ये तीन कोटी ४० लाख नागरिक दाखल. मुख्यत्वे अफगाणी रहिवासी
युरोपातील विविध देशांमध्येही पाच कोटी ७० लाख नागरिक दाखल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.