तिने सोडली पोलिसांची नोकरी अन् झाली सोशल मीडिया स्टार

Leanne Carr
Leanne CarrLeanne Carr
Updated on

प्रसिद्धीची हाव कोणालाही असते. यासाठी अनेकजण वाटेल ते करायला तयार असतात. शॉर्ट कपडे घालण्यापासून वादग्रस्त वक्तव्य करण्यापर्यंत अनेकजण मजल मारतात. मात्र, कोणी सहज निर्णय घेतात आणि प्रसिद्ध होतात. असाच काहीसा प्रकार ब्रिटेमधील महिलेशी घडला. पोलिस असलेली महिला नोकरी सोडून सोशल मीडिया स्टार (Social media star) झाली. विभागाने दिलेल्या वाईट वागणुकीमुळे (Social media star) तिने पोलिसाची नोकरी सोडल्याचे सांगितले.

‘द मिरर’ने दिलेल्या वृत्तानुसार लीन कॅर (Leanne Carr) (वय ३६) असे महिलेचे नाव आहे. तिने ब्रिटनमध्ये लिंकनशायर पोलिसांसाठी काम (woman Police Officer) केले आहे. विभागाकडून मिळालेल्या वाईट वागणुकीमुळे तिने नोकरी सोडली. आता ती इंस्टाग्रामवर खूप लोकप्रिय झाली आहे. तिच्या फॉलोअर्सची संख्या लाखोंच्या घरात आहे. सोशल मीडियावर ३६ वर्षीय लीन कारचे फोटो आणि व्हिडिओ यूजर्सना लाइक करीत असतात.

Leanne Carr
रात्री उशिरा दोघेही करीत होतो उलट्या; आईच्या लक्षात येईपर्यंत...

मानसिक आजाराचे कारण सांगून प्रवास केल्याचा आरोप तिच्यावर झाला होता. लीनने नोकरी सोडताना कधीही परत न येण्याची शपथ घेतली होती. पोलिस अधिकारी म्हणून करिअर सोडल्यानंतर लीने सोशल मीडियाचा वापर करण्यावर भर दिला. तसेच मॉडेलिंगला सुरुवात केली. पाहता पाहता ती सोशल मीडियावर चांगलीच प्रसिद्ध झाली असून चांगली कमाई करीत आहे.

View this profile on Instagram

Leanne Carr (@theleaway) • Instagram photos and videos

२०१८ मध्ये सोडली नोकरी

लीनने २०१८ मध्ये पोलिस सेवेचा राजीनामा दिला होता. विभागाने आपल्याशी गैरवर्तन केल्याचे तिचे म्हणणे आहे. ती तिचे काम प्रामाणिकपणे करीत होती. ती वेगवेगळ्या ठिकाणांहून तिचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करायची. त्यामुळे तिचे सहकारी कर्मचारी तिची छेड काढायचे. मात्र, नोकरी सोडल्यानंतर लीने तिच्या प्रवासाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करायला सुरुवात केली तेव्हा लोकांनी तिला लाईक करायला सुरुवात केली. हे पाहून लीने सोशल मीडियावर मॉडेल बनली आणि कमाई करू लागली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.