जपानमधील भूकंपात 8 जणांचा मृत्यू; आतापर्यंत बसलेत तब्बल 155 झटके

major earthquake that struck central Japan: जपानमध्ये आतापर्यंत तब्बल १५५ भूंकपाचे झटके बसले आहेत. त्यातील ७.६ रिश्टर स्केकलचा सर्वाधिक तीव्रेतेचा होता, जपानच्या मेट्रोलॉजिकल विभागाने यासंदर्भातील माहिती दिली आहे.
least eight people died in a major earthquake that struck central Japan on New Year Day
least eight people died in a major earthquake that struck central Japan on New Year Day
Updated on

टोकियो- जपानमध्ये आतापर्यंत तब्बल १५५ भूंकपाचे झटके बसले आहेत. त्यातील ७.६ रिश्टर स्केकलचा सर्वाधिक तीव्रेतेचा होता, जपानच्या मेट्रोलॉजिकल विभागाने यासंदर्भातील माहिती दिली आहे. जपानमधील भूकंपामध्ये आतापर्यंत ८ लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. (least eight people died in a major earthquake that struck central Japan on New Year Day )

नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी जपानला भूकंपाचा सामना करावा लागला. ३ रिश्टर स्केलच्या पुढील अनेक भूकंपाचे झटके जपानमध्ये आले. त्यामुळे त्सुनामीचा धोका देखील निर्माण झाला. जपानच्या किनाऱ्यावर पाच मीटर उंचीपर्यंतच्या लाटा धडकू लागल्या आहेत.

least eight people died in a major earthquake that struck central Japan on New Year Day
Sakal Podcast : जपानमध्ये 7.5 तीव्रतेचा भूकंप, त्सुनामीची पहिली लाट धडकली ते गोगावलेंचं मंत्रिपद आता 'राम'भरोसे!

भूकंप आणि त्यामुळे आलेल्या त्सुनामीमुळे जपानमध्ये नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अनेक घरं उद्धवस्त झाले आहेत. तर अनेक ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. जपान सरकारने जनतेला उंच सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहन केले आहे. जपानमध्ये भूकंपाच्या घटना वारंवार घडत असतात. त्यादृष्टीने त्यांच्या घरांची रचना केलेली असते. शिवाय घरामध्ये भूकंप झाल्यास मदतीला येऊ शकतील अशा वस्तू ठेवलेल्या असतात.

होंशू बेटावरील इशिकावा प्रातांत ७.५ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. त्यामुळे २ ते ३ मीटरपर्यंतच्या त्सुसानीच्या लाट किनाऱ्यावर धडकल्या. त्यामुळे बंदराचे नुकसान झाले आहे, तसेच किनाऱ्या लगतच्या इमारती आणि रस्ते यांचे देखील नुकसान झाले आहे. अनेक फिशिंग बोट्स पाण्यात बुडाल्या आहेत. सोशल मीडियावर काही व्हिडिओ व्हायरल होत असून यात विध्वंस दिसून येत आहे.

least eight people died in a major earthquake that struck central Japan on New Year Day
Delhi : थेट परकीय गुंतवणुकीत २४ टक्के घसरण,नेदरलँड, जपान व जर्मनीचा वाढता कल; राज्यांमध्ये महाराष्ट्र आघाडीवर

भूकंपाची घटना घडल्यानंतर जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी नैसर्गिक आपत्ती टीमची बैठक घेतली होती. यावेळी प्रशासनाला आवश्यक त्या सुचना दिल्या आहेत. किशिदा म्हणाले की, अनेक ठिकाणी नुकसानीच्या घटना घडल्या आहेत. अनेक बिल्डिंग कोसळल्या असून आगीच्या घटनाही समोर आल्या आहेत. आपत्तीमध्ये अडकलेल्या लोकांना लवकरात लवकर मदत देण्याच आव्हान आपल्या समोर आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.