कोणत्याही परिस्थितीत खारकिव्ह सोडा; भारतीयांनी दूतावासाची नवीन सूचना

Leave Kharkiv under any circumstances
Leave Kharkiv under any circumstancesLeave Kharkiv under any circumstances
Updated on

भारतीय दूतावासाने (Embassy) बुधवारी नवीन ॲडव्हायझरी जारी केली आहे. यामध्ये युक्रेनचे दुसरे सर्वांत मोठे शहर खारकिव्ह येथे राहणाऱ्या भारतीयांना तात्काळ शहर सोडण्यास सांगितले आहे. (Leave Kharkiv under any circumstances)

खारकिव्हमधील सर्व भारतीय नागरिकांना तातडीची सूचना जारी करताना त्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि आरोग्यासाठी ताबडतोब खारकिव्ह (Kharkiv) सोडावे लागेल, असे सांगण्यात आले आहे. सर्व भारतीय पेसोचिन (PESOCHIN,), बीबीएए (BBAAYE) आणि बेझल्युडोव्का (BEZLYUDOVKA) या शहरांकडे रवाना झाले पाहिजे, असेही सांगण्यात आले आहे. सल्ल्यानुसार, कोणत्याही परिस्थितीत भारतीय नागरिकांनी बुधवारी (युक्रेनियन वेळ) १८ पर्यंत या नमुद ठिकाणी पोहोचले पाहिजे.

खारकिव्हवर रशियाचा (russia) हल्ला तीव्र होत चालला आहे. प्रादेशिक पोलिस आणि गुप्तचर मुख्यालयावरील हल्ल्याचा व्हिडिओ (video) ऑनलाइन प्रसारित होत आहे. ज्यामध्ये इमारतीचे छत उडून गेले आणि वरच्या मजल्याला आग लागली आहे, असे व्हिडिओत दिसत आहे. या हल्ल्यामुळे खारकिव्हवासीयांमध्ये चांगलीच भीती पसरली आहे. नुकसान झालेल्या पाच मजली इमारतीचे भाग रस्त्यांवर विखुरलेले दिसत आहे. युक्रेन सरकारच्या स्ट्रॅटेजिक कम्युनिकेशन सेंटरने बुधवारी खारकिव्हमधील हल्ल्याचे फोटो प्रसिद्ध केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.