बैरुतमधील स्फोटाने चर्चेत आलेला लेबनॉन आधीपासूनच संकटात!

Lebanon already in crisis after the Beirut bombing
Lebanon already in crisis after the Beirut bombing
Updated on

बैरुत- लेबनॉनच्या बैरुत शहरात मंगळवारी भयंकर स्फोट झाला. या स्फोटात 100 पेक्षा अधिक लोकांचा जीव गेला आहे, तर 1 हजारांपेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत. स्फोट लेबनॉनसाठी मोठे संकट घेऊन आला आहे. कारण याआधीच लेबनॉन कोरोनो महामारी आणि आर्थिक संकटाचा सामना करत आहे. देशातील आर्थिक परिस्थितीमुळे हजारो लोकांना गरिबीत ढकलले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात सरकारविरोधात आंदोलने सुरु आहेत. 

लेबनॉनवर आर्थिक संकट

कोरोना महामारीच्या उद्रेकाआधीपासूनच लेबनॉनमध्ये आर्थिक संकट आहे. देशावरील सार्वजनिक कर्ज एकूण उत्पादनाशी तुलना करता खूप अधिक आहे. विशेष म्हणजे लेबनॉनचा याबाबतीत जगात तिसऱ्या क्रमांक लागतो. देशातील बेरोजगारी 25 टक्क्यांच्या पुढे आहे. तसेच एक तृतीयांश लोकसंख्या गरिबी रेषेच्या खाली जगत आहे. 

नेपाळ पाठोपाठ पाकिस्तानचाही नवा नकाशा; भारताच्या भूभागावर दावा

लेबनॉन सरकार नागरिकांचा पायाभूत सुविधा पुरवण्यासही असमर्थ ठरली आहे. त्यामुळे लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. विज वारंवार जाणे, पिण्यासाठी अशुद्ध पाणी, सार्वजनिक आरोग्य सेवेचा तुतवडा आणि जगातील सर्वात वाईट इंटरनेट सुविधा अशा समस्यांना लेबनॉनच्या नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. लेबनॉनच्या या परिस्थितीसाठी सत्ताधाऱ्यांना जबाबदार धरलं जातंय. सत्तेतील काही लोकांनी स्वत:साठीच  संपत्ती जमवल्याचा आरोप होतोय.

आंदोलन का उसळले?

2019 च्या सुरुवातीला परदेशी चलनामुळे लेबनॉनच्या पाँडची किंमत डॉलरच्या तुलनेत घसरत गेली. ऑक्टोबरमध्ये सरकारने तंबाखू, पेट्रोल आणि वॉईस कॉलवर नवे कर लागू केले. उत्पन्न वाढवण्यासाठी सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला होता. नंतर लोकांच्या विरोधामुळे हा निर्णय मागे घ्याला लागला. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांमध्ये सरकार विरोधात असंतोष दाटत होता. जवळजवळ 10 हजारांपेक्षा अधिक लेबनोन नागरिकांनी रस्त्यावर उतरुन पश्चिमेचा पाठिंबा असणारे प्रधानमंत्री साद हरीरी आणि त्यांचा युनिटी सरकारचा राजीनामा मागितला. हरीरी यांच्या राजीनाम्यानंतर हसन डियाब पंतप्रधान झाले. मात्र, लोकांचा असंतोष कायम राहिला.

कोरोनाच्या उद्रेकाने परिस्थिती बिघडली

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे देशात मार्चमध्ये टाळेबंदी लागू करण्यात आली. यामुळे लोक रस्त्यांवर येणे बंद झालं, पण देशातील आर्थिक स्थिती अधिक बिघडत गेली. अनेक उद्योगधंदे बंद पडले. लोकांच्या हाताला काम मिळणे जवळजवळ बंद झाले. चलनवाढ इतकी झाली की सामान्य लोकांचा आवश्यक वस्तू खरेदी करणेही कठीण झालं आहे. 

तज्ज्ञांच्या मते राजकीय गटांमुळे किंवा राजकीय नेत्यांचे हित देशाच्या हितापेक्षा मोठे ठरत असल्याने असं होत आहे. देशात मुस्लीम आणि खिश्चन लोकसंख्या मोठी आहे. 1943 च्या नियमांनुसार येथील राष्ट्रपती, संसद अध्यक्ष आणि पंतप्रधान हे पद अनुक्रमे ख्रिश्चन, शिया मुस्लीम आणि सुन्नी मुस्लिम यांच्याकडे असते. संसदेच्या 128 जागाही मुस्लीम आणि ख्रिश्चन धर्मियांमध्ये वाटण्यात आल्या आहेत. या दोन धर्मियांची संख्या मोठी असल्याने इतर राष्ट्रे देशाच्या कारभारात हस्तक्षेप करत असतात. त्यामुळे येथील परिस्थिती नेहमी अस्थिर असते. भ्रष्टाचार इंडेक्समध्ये लेबनॉनचा 180 देशांच्या यादीत 137 वा क्रमांक आहे.

लेबनॉनमध्ये आहेत संयुक्त राष्ट्राची शांतीसेना

लेबनोनच्या उत्तरेला खदखदत असलेला सिरिया आणि दक्षिणेला इस्त्राईल देश आहे. इस्त्राईलने लेबनोनचा काही भाग बळकावला आहे. त्यानंतर 1978 मध्ये संयुक्त राष्ट्राची शांती सेना याठिकाणी तैनात करण्यात आली. इस्त्राईल आणि लेबनोनच्या सैनिकांमध्ये दक्षिण सिमेवर नेहमी झडप होत असते. 2010 मध्ये  इस्त्राईल आणि लेबनोनमध्ये रक्तरंजित संघर्ष झाला होता. उभय देशांमधील तणाव कमी करण्यासाठी संयुक्त राष्ट्र प्रयत्न करत आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.