पाकिस्तानमध्ये अविश्वास प्रस्तावाला सामोरे जाणाऱ्या पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांना कायदेशीर शाखेने परराष्ट्र कार्यालयाला गोपनीय माहिती देऊ नये, असा इशारा (Legal branch) दिला आहे. असे न केल्यास आजीवन अपात्रतेसारखे गंभीर परिणाम होऊ शकतात, असे कायदेशीर शाखेने इम्रान खान यांना सांगितले आहे. (Legal branch warning to Imran Khan)
द एक्सप्रेस ट्रिब्यूनच्या वृत्तानुसार, इम्रान खान (Imran Khan) यांनी परराष्ट्र कार्यालयाच्या गुप्त माहितीबाबत कायदेशीर शाखेकडून कायदेशीर सल्ला मागितला होता. इम्रान खान यांनी दावा केला आहे की, एका परदेशी देशाने पाकिस्तानच्या राजदूताद्वारे धमकीचा संदेश पाठवला आहे. तथापि, कायदेशीर शाखेने इम्रान खान यांना ऑफिशियल सिक्रेट्स ॲक्ट, १९२३ च्या कक्षेत येणारी राजनयिक गुप्तचर माहिती सामायिक करण्याविरुद्ध चेतावणी दिली आहे.
मीडिया आउटलेटने सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, ते कोणाशीही माहिती शेअर करू शकत नाही तसेच सार्वजनिक करू शकत नाही. जर पंतप्रधानांनी राजनयिक सिफर सामायिक केले तर ते त्यांच्या शपथेचे उल्लंघन मानले जाईल. ज्यानंतर त्यांना देशाच्या घटनेच्या अनुच्छेद ६२(१)(f) अंतर्गत आजीवन अपात्र ठरवले जाऊ शकते.
कायदेशीर शाखेचा (Legal branch) सल्ला अशावेळी आला जेव्हा इम्रान खान (Imran Khan) यांनी गुरुवारी देशात परदेशी षड्यंत्राच्या दाव्यांचा पुनरुच्चार केला आणि म्हटले की, एक परदेशी राष्ट्र त्याच्याद्वारे केलेल्या स्वतंत्र परराष्ट्र धोरणाच्या निवडीवरून त्यांची हकालपट्टी करण्याचा प्रयत्न करीत आहे. अविश्वास प्रस्तावापूर्वी पाकिस्तानी जनतेला संबोधित करताना इम्रान खान यांनी दावा केला होता की, एका एका परदेशी देशाने मेसेच करून इम्रान खान यांना हटवण्याची गरज आहे, अन्यथा देशाला भयंकर परिणाम भोगावे लागतील, असे म्हटले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.