Canada: 'कॅनडा खलिस्तानी चळवळ विसरलाय'; ट्रुडोंच्या पक्षातील हिंदू खासदाराचे सरकारवर ताशेरे, सांगितल्या 3 घटना

Liberal party MP Chandra Arya
Liberal party MP Chandra Arya
Updated on

नवी दिल्ली- भारत आणि कॅनडामध्ये तणाव निर्माण झाला आहे. याचा परिणाम कॅनडातील भारतीयांवर पडताना दिसत आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या सरकारमधील खासदार चंद्रा आर्या यांनी देशातील हिंदूंबाबत चिंता व्यक्त केली आहे. कॅनडातील हिंदूंमध्ये भीतीचे वातावरण आहे. यासाठी जस्टिन ट्रुडो यांचे सरकारच जबाबदार असल्याचं ते म्हणाले आहेत.

ट्रुडो सरकारने कट्टरतावादी लोकांवर कारवाई केली नाही. त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचं लिबरल पार्टीचे खासदार चंद्रा आर्या म्हणाले.कॅनडातील हिंदू लोकांना कट्टरतावाद्यांकडून धमकी मिळत आहे. त्यामुळे येथील हिंदूंची काळजी वाटते, असंही ते म्हणाले. चंद्रा यांनी यापूर्वीही अनेकदा कॅनडातील हिंदूंच्या सुरक्षेविषयी आवाज उठवला आहे.

Liberal party MP Chandra Arya
India-Canada row: कॅनडा दहशतवादी-कट्टरतावाद्यांसाठी सुरक्षित आश्रयस्थान; भारताकडून जस्टिन ट्रूडो यांच्यावर हल्लाबोल

पंतप्रधान ट्रुडो यांच्या वक्तव्याचे काय परिणाम होतील याची मला काळजी वाटते. कॅनडातील हिंदूची सुरक्षा महत्त्वाची आहे. येथील हिंदुंमध्ये भीतीचे वातावरण आहे. कॅनडामध्ये हिंदूंना धोका निर्माण झालाय, असं चंद्रा म्हणालेत. त्यांनी त्यांच्या भीतीमागील तीन कारणेही सांगितले आहेत.

१. ते म्हणाले की, 'खलिस्तानी चळवळीचा इतिहास हा हिंसक आणि रक्तरंजित राहिला आहे. खलिस्तानी चळवळीत इतिहासात हजारो हिंदू आणि शीखांचा मृत्यू झाला आहे. ३८ वर्षांपूर्वी काय झालं हे कॅनडियन नागरिक विसरले आहेत. एअर इंडिया बॉम्बिंगची घटना आठवावी. हा हल्ला कॅनडातील खलिस्तानी दहशतवाद्यांनीच केला होता. आणि यातील दहशतवाद्यांना आजही कॅनडातील काही भागात पुजलं जातं.'

२.काही महिन्यांपूर्वी कॅनडामध्ये एक मिरवणूक काढण्यात आली होती. यात, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना रक्ताच्या थारोळ्यात दाखवण्यात आलं होतं. गांधी यांच्या मारेकऱ्यांनी त्यांच्यावर बंदूक रोखल्या होत्या. हा दहशतवादाचा प्रकार आहे. कोणता देश तुम्हाला अशी परवानगी देतो. अभिव्यक्ती स्वांतत्र्यांच्या नावाखाली असं तुम्ही कसं सुरु ठेवू शकता, असं ते म्हणाले.

Liberal party MP Chandra Arya
NIA कडून खलिस्तानी दहशतवाद्याला झटका! भारतीयांना कॅनडा सोडायला लावणाऱ्या पन्नूची संपत्ती जप्त, 'या' ठिकाणी होती मालमत्ता

३.खलिस्तानी दहशतवादी गुरुपतवंत सिंग पन्नू याने कॅनडातील हिंदूंना जगासमोर धमकी दिली. हिंदूंना कॅनडा सोडून भारतात जाण्यास सांगितले. त्याला कोणीही रोखलं नाही. सगळं उघड घडलं आहे, असं ते म्हणाले. चंद्रा आर्या यांनी ट्रुडो यांना आरसा दाखवल्याचं बोललं जातंय. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()