Micro Photography : मुंगीचा जवळून काढलेला फोटो पाहिला का? अक्षरशः अंगावर काटा येईल!

एखाद्या हॉरर चित्रपटात शोभेल इतकी भयानक ही मुंगी दिसत आहे.
Ant Close Up Photo
Ant Close Up PhotoSakal
Updated on

एखादी गोष्ट जवळून पाहिल्यावर वेगळी दिसते आणि लांबून पाहिल्यावर खूप वेगळी दिसते. हे केवळ माणसांच्याच बाबतीत होतं असं नाही. प्राण्यांच्या बाबतीतही हे होतं. बऱ्याचदा आपण फुलांचे जवळून काढलेले फोटो पाहिलेले असतील, ज्यामध्ये त्यातली संरचना स्पष्टपणे दिसते. पण तुम्ही कधी मुंगीचा जवळून काढलेला फोटो पाहिला आहे का?

लिथुनियाच्या एका फोटोग्राफरने मुंगीचा जवळून फोटो काढला आहे. ज्यामध्ये ही इवलीशी मुंगी एखाद्या राक्षसाप्रमाणे दिसत आहेत. युजेनिजस कॅवलियुस्कस असं या फोटोग्राफरचं नाव आहे. त्याने निकॉन स्मॉल वर्ल्ड फोटो मायक्रोग्राफिक स्पर्धेत हा फोटो पाठवला होता. या स्पर्धेचं वैशिष्ट्यच हे असतं की यामध्ये असे फोटो काढायचे असतात, जे उघड्या डोळ्यांना दिसत नाहीत.

या फोटोग्राफरने आपला फोटो काढतानाचा अनुभवही सांगितला आहे. तो म्हणाला, "मुंगीचा फोटो काढणं इतकं सोपं नव्हतं. मुंगीचा फोटो काढणं प्रचंड कंटाळवाणं आहे. मुंगी सतत पळत होती. पण मला मुंगीचा प्रत्येक बारकावा टिपायचा होता. माझं फोटो काढण्यामागचं ध्येय काहीतरी शोधणं हे होतं. निसर्गाचा चमत्कार मला या निमित्ताने पाहायला मिळाला."सोशल मीडियावर हा फोटो वेगात व्हायरल होत आहे. अनेक नेटकऱ्यांनी हे भयंकर असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. एखाद्या हॉरर चित्रपटात शोभेल इतकी भयानक ही मुंगी दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.