Liz Truss Resigns: ब्रिटनच्या पंतप्रधावर विजाजमान झाल्याच्या 6 आठवड्यांच्या आतच लिझ ट्रस यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. ट्रस या ब्रिटनच्या इतिहासातील सर्वात कमी कालावधीचे पंतप्रधान ठरल्या आहेत. यापूर्वी 1827 मध्ये जॉर्ज कॅनिंग 119 दिवस पंतप्रधान होते.त्यांच्या कार्यकाळाच्या मध्यावर त्यांचे निधन झाले होते. ट्रस या भारतीय वंशाच्या ऋषी सुनक यांचा पराभव करून त्या पंतप्रधान झाल्या होत्या. वृत्तानुसार, पुढील आठवड्यात नव्या पंतप्रधानाची निवडणूक होऊ शकते. तोपर्यंत ट्रस याच पदावर कायम राहणार आहेत.
राजीनामा का दिला?
लिट ट्रस यांना त्यांच्या पक्षांतर्गत विरोध होऊ लागला होता. एक दिवस आधी, गृहमंत्री सुएला ब्रेव्हरमन यांनी कॅबिनेटमध्यून राजीनामा दिला. ट्रस यांनी सांगितले की त्यांना जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करता आली नाहीत आणि पक्षाचा विश्वास गमावला आहे. ऋषी सुनक यांना पंतप्रधान करण्याची मागणी कंझर्व्हेटिव्ह पक्षात जोर धरू लागली आहे. ब्रिटीश खासदारांचा आरोप आहे की ट्रसच्या समर्थकांनी संसदेत गॅस ड्रिलिंगच्या विरोधात मतदान करण्याचा कट रचला होता. दरम्यान कंझर्व्हेटिव्ह खासदारांमध्ये ट्रसविरोधात रोष होता. अशा परिस्थितीत खासदारांच्या मतदानानेच ऋषी सुनक यांना पंतप्रधानपद मिळू शकते.
अर्थिक संकटामुळे गदारोळ
आर्थिक योजना सादर केल्यानंतरच गदारोळ सुरू झाला आणि राजकीय पेच निर्माण झाला. यानंतर लिझ ट्रस यांनी अर्थमंत्री बदलले आणि नंतर स्वतःची अनेक अर्थिक धोरणे बदलली. लिझ ट्रस यांनी आश्वासन दिले होते की त्या अर्थव्यवस्था रुळावर आणतील आणि महागाई नियंत्रित करेल. मात्र, ट्रस यांनी नवे अर्थमंत्री करताना जुन्या अर्थमंत्र्यांचे सर्व निर्णय झुगारून दिले. यानंतर पक्षातच बंडखोरी सुरू झाली. या नेतृत्वावर पक्षाचे खासदार संतप्त झाले.
अर्थमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयांचा बाजारावर वाईट परिणाम होत होता. अस्थिरता वाढत होती. तसेच पाउंड कमकुवत होऊ लागला होता. यूकेच्या अर्थव्यवस्थेवर देशाबाहेरही टीका सुरू झाली होती. मात्र, कर कपातीच्या मुद्द्यावरून ट्रस यांनी विश्वास संपादन केला आणि त्या पंतप्रधान झाल्या. मात्र पंतप्रधान झाल्यानंतर ते त्यांना जड झाले.
ऋषी सुनक यांना संधी मिळेल का?
पंतप्रधान पदाच्या निवडणुकीत सुरुवातीच्या टप्प्यात भारतीय वंशाचे ऋषी सुनक पुढे होते. मात्र, नंतर त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.आता ऋषी सुनक हे ब्रिटनचे पंतप्रधान होण्याची शक्यता आहे. अनेक टोरी सदस्य सुनकला पाठिंबा देण्यास इच्छुक आहेत. एका सर्व्हेनुसार, 32 टक्के टोरी सदस्यांना बोरिस जॉन्सन पंतप्रधान व्हावेत अशी इच्छा आहे. त्याच वेळी, 23% ऋषी सुंकाचे समर्थन करतात. ट्रस यांची पंतप्रधानपदी निवड करण्याच्या निर्णयावर टोरी सदस्य खेद व्यक्त करत होते. अशा परिस्थितीत त्यांना ऋषी सुनकच्या रूपाने एक पर्याय आहे. सुनक यांनी ट्रसला कर कपातीबद्दल आधीच इशारा दिला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.