नेदरलँडमधील राजघराण्याला आता समलिंगी विवाह करता येणार असून याबाबत देशात कायद्याला मंजुरी मिळालीय.
नेदरलँडमधील (Netherlands) राजघराण्याला आता समलिंगी विवाह करता येणार असून याबाबत देशात कायद्याला मंजुरी मिळालीय. नेदरलँडचे पंतप्रधान मार्क रूट (Prime Minister Mark Rutte) यांनी म्हटलंय, की डच राजघराण्याचे सदस्य सिंहासन न सोडता समलिंगी विवाह करू शकतात. त्यामुळे वारसदार किंवा राजाला समलिंगी पुरुषाशी लग्न करण्यासाठी त्याचे 'शाही सिंहासन' (Royal Throne) सोडावे लागणार नाही, असं पंतप्रधान रूट यांनी मंगळवारी कायदेतज्ञांच्या बैठकीत स्पष्ट केलंय.
डच शाही विवाहांना आता संसदेची मंजुरीही आवश्यक आहे. 'अमालिया, कॉल्स ऑफ ड्यूटी' (Amalia Calls of Duty) नावाच्या पुस्तक प्रकाशनप्रसंगी पंतप्रधान बोलत होते. राजकुमारी अमालिया ही राजा विलेम-अलेक्झांडरची (King Williams-Alexander) मोठी मुलगी आहे. ती 7 डिसेंबरला 18 वर्षांची होईल. जूनमध्ये अमालियानं हायस्कूल उत्तीर्ण केलंय.
विद्यापीठात प्रवेश घेण्यापूर्वी अमालियानं एक वर्षाचं अंतर जाहीर केलं. (अमालियानं Princess Catharina Amalia) 1.6 दशलक्ष युरो वार्षिक भत्ता नाकारला असून ती 18 वर्षांची झाल्यावर तीचा यावर हक्क असणार असल्याचं तिनं म्हटलंय. वर्षाच्या सुरुवातीला पीएम रूट यांना लिहिलेल्या पत्रात तिनं म्हटलं होतं, की मला हे पैसे घेणे योग्य वाटत नाहीत. कारण, त्या बदल्यात मी काहीच करत नाही. मात्र, असे अनेक विद्यार्थी आहेत, जे कोरोनामुळे कठीण काळातून जात आहेत, त्यांना पैसा द्यावा, असं तिनं स्पष्ट केलं होतं.
रूट म्हणाले, आधुनिक कौटुंबिक कायदा नागरी जीवनाशी संबंध प्रस्थापित करण्यास मदत करतो. समलिंगी विवाहासंदर्भात नवीन निर्णयावर अमालियानं अद्याप काहीही सांगितलं नाही. मात्र, तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फार कमी लोकांना माहित आहे. नेदरलँड्समध्ये 2001 मध्ये समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता मिळालीय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.