राष्ट्रपिता महात्मा गांधींचे पणतू सतिश धुपेलिया यांचे कोरोनामुळे निधन

Satish Dhupelia
Satish Dhupelia
Updated on

महात्मा गांधी (mahtama gandhi) यांचे पणतू सतिश धुपेलिया (Satish Dhupelia) यांचे कोरोनामुळं (Corona) निधन झाले आहे. ते 66 वर्षांचे होते. दक्षिण आफ्रिकेत (South Africa) त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सतिश धुपेलिया यांना न्युमोनिया झाला होता. त्यानंतर उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. त्यांची बहिण उमा धुपेलिया-मेस्थरी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून यासंदर्भातील माहिती दिली आहे.  

सतिश धुपेलिया यांच्यावर महिन्याभरापासून दक्षिण आफ्रिकेतील केपटाउनमधील रुग्णालयात उपचार सुरू होते. या दरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाली. सोमवारी रुग्णालयातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.  महात्मा गांधी यांचे चिरंजीव मणिलाल गांधी हे दक्षिण आफ्रिकेत वास्तव्यास होते. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

 सतिश धुपेलिया हे मीडियात काम करत होते. मीडियात त्यांनी व्हिडीओग्राफर आणि फोटोग्राफर म्हणून काम केले. त्याचबरोबर ते दरबनजवळील गांधी विकास ट्रस्टच्या कामकाजात ते सक्रिय होते. त्यांनी अनेक सामाजिक संस्थांसोबत काम केले होते. आफ्रिका खंडात कोरोनाने कहर माजवला आहे. येथील रुग्णसंख्या 20 लाखांहून अधिक पोहचली आहे.  दुसऱ्या लाटेत संसर्ग आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.