न्यूयॉर्क : महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरू या भारतीय नेत्यांनी डॉ. मार्टिन ल्यूथर किंग यांच्यासह अनेकांना लोकशाही आणि अहिंसा याविषयी प्रेरणा दिली, असे न्यूयॉर्क राज्याच्या गव्हर्नर कॅथी हॉचुल यांनी मंगळवारी म्हटलं. सर्वसमावेशकता, समानता, भाषण स्वातंत्र्य आणि धर्मिक मूल्यांमुळे भारत आणि अमेरिका एकसंध असल्याचंही त्या म्हणाल्या. (Mahatma Gandhi, Jawaharlal Nehru news in Marathi)
भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त क्वीन्स म्युझियममध्ये भारतीय-अमेरिकन समुदायाच्या सदस्यांना संबोधित करताना, होचुल म्हणाल्या की भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांनी वसाहतवादी राजवट उलथून टीकली. भारताने पारतंत्र्यांतून स्वतःची मुक्तता करून 75 वर्षे पूर्ण होत आहेत. आता भारतातील लोक लोकशाहीच्या दिशेने वाटचाल करत असल्याचंही होचुल यांनी नमूद केलं.
"युनायटेड स्टेट्समध्ये, आम्ही वसाहतवादी राजवट नाकारणे, लोकशाही स्वीकारणे, सर्वसमावेशकता, समानता, भाषण स्वातंत्र्य आणि अर्थातच स्वातंत्र्य या मुल्यांनी अमेरिका आणि भारताला बांधून ठेवलं आहे. भारत आणि अमेरिका ही मुल्य एकमेकांकडून शिकत असल्याचंही होचुल यांनी म्हटलं.
गांधी आणि नेहरुंनी अहिसा आणि लोकशाहीबद्दल इतरांना नेहमीच प्रेरणा दिली. यांच्याविषयी आपण शाळेत शिकलो. संघर्ष म्हणजे काय, लोकशाही रुजवणे आणि अहिंसेबद्दल डॉ. किंग नेहमी गांधी आणि नेहरू यांचा उल्लेख करायचे, असंही होचुल यांनी सांगितलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.