Hajj Pilgrims: मक्का येथे हज यात्रेसाठी गेलेल्या 68 भारतीयांचा मृत्यू, उष्णतेमुळे मृतांची संख्या 600 च्या वर...

Hajj Pilgrims: वृत्तानुसार, मृत हज यात्रेकरूंचे मृतदेह देशात परत पाठवले जाणार नाहीत, त्यांचे दफन सौदी अरेबियातच केले जाईल.
Hajj Pilgrims
Hajj Pilgrimsesakal
Updated on

सौदी अरेबियामध्ये हजदरम्यान 600 हून अधिक हज यात्रेकरूंचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. दरम्यान भारतातून हजला गेलेल्या यात्रेकरूंच्या कुटुंबीयांची चिंता वाढली आहे. यावर्षी भारतातून 1,75,000 यात्रेकरू हजला गेले होते. यापैकी मृत्यू झालेल्यांमध्ये 68 भारतीयांचाही समावेश असल्याची माहिती मिळाली आहे.

गेल्या आठवडाभरात हे मृत्यू झाले असून हजच्या शेवटच्या दिवशी ६ भारतीयांचा मृत्यू झाला आहे. अनेक मृत्यू नैसर्गिक कारणांमुळे आणि वृद्धांचे झाले आहेत, तर काही मृत्यू अति उष्णतेमुळे झाले आहेत. भारतीय नागरिकांच्या मृत्यूबाबत भारत सरकारकडून अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी करण्यात आलेले नाही. (Latest Marathi Global News)

एएफपी वृत्तसंस्थेनुसार, नवीन अहवालानुसार, ही संख्या 645 झाली आहे. गेल्या वर्षी हजदरम्यान 200 हून अधिक मृत्यूची नोंद झाली होती. मृत हज यात्रेकरूंपैकी बहुतांश इजिप्तचे नागरिक आहेत.

Hajj Pilgrims
Ajit Pawar : पश्चिम महाराष्ट्रात अजितदादांना मोठा धक्का? 'हा' माजी आमदार महाविकास आघाडीत जाण्याची शक्यता!

हजदरम्यान मरण पावलेल्या 600 हून अधिक हज यात्रेकरूंपैकी सर्वाधिक 323 इजिप्तमधील, 35 ट्युनिशिया, 44 इंडोनेशिया, 41 जॉर्डन, 68 भारतातील आणि 11 इराणचे होते. वृत्तानुसार, मृत हज यात्रेकरूंचे मृतदेह देशात परत पाठवले जाणार नाहीत, त्यांचे दफन सौदी अरेबियातच केले जाईल.

हवामान बदलाचे परिणाम जगभर दिसून येत आहेत. आखाती देशांना याचा अधिक फटका बसत आहे, ओमान, सौदी अरेबिया आणि यूएई सारख्या देशांमध्ये उष्णतेसोबतच मुसळधार पाऊसही पडत आहे. सौदी अरेबियातील तापमान साधारणपणे ४५ अंशांच्या दरम्यानच राहते, मात्र यावर्षी तापमानाने 50 अंशांचा टप्पा ओलांडला आहे. सौदी सरकारी टीव्हीच्या वृत्तानुसार, मक्काच्या ग्रँड मशिदीतील तापमान यावर्षी 51 अंशांवर पोहोचले आहे.

Hajj Pilgrims
IIT Bombay fines students: IIT बॉम्बेच्या विद्यार्थ्यांचा पराक्रम! नाटकात प्रभू राम अन् सीतेची केली चेष्टा, संस्थेने दिली कठोर शिक्षा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.