नवी दिल्ली : अफगाणिस्तानमधील परिस्थिती आता संपूर्ण हाताबाहेर गेली आहे. त्या ठिकाणी तालिबान्यांची सत्ता प्रस्थापित होणार, हे आता जवळपास निश्चित झाले आहे. अफगाणिस्तानमध्ये तालिबानच्या वाढत्या वर्चस्वामुळे अशरफ घनी हे पाऊल उचलण्याची दाट शक्यता आहे. जर त्यांनी राजीनामा दिला तर त्यानंतर आता तालिबान कमांडर मुल्ला अब्दुल घनी बरादर अफगाणिस्तानचे राष्ट्रपती बनू शकतील. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रपती अश्रफ घनी यांनी देश सोडला आहे. सुत्रांकडून ही माहिती मिळाली आहे. या सगळ्या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली जात आहे. तालिबान्यांच्या हल्ल्यातून वाचलेली नोबेल पुरस्कारप्राप्त मलाला युसूफजई हिने देखील चिंता व्यक्त केली आहे.
तिने म्हटलंय की, तालिबानने संपूर्ण अफगाणिस्तानचा ताबा घेतल्याचं पाहून आम्हा सर्वांना धक्का बसला आहे. मला सध्या तिथल्या महिला, अल्पसंख्याक आणि मानवी अधिकारांच्या समर्थकांची खूपच चिंता वाटतेय. जागतिक, प्रादेशिक आणि स्थानिक शक्तींनी त्वरित युद्धबंदीची मागणी केली पाहिजे, तातडीने मानवतावादी मदत दिली पाहिजे आणि निर्वासित आणि नागरिकांचे संरक्षण केले पाहिजे.
तालिबान्यांनी ९ ऑक्टोबर 2012 रोजी मिंगोरानगरमध्ये आपल्या शाळेतून परतणाऱ्या मलाला युसूफजईवर गोळीबार केला होता. तालिबान्यांच्या अत्याचाराविरुद्ध तिने आक्रमक लिखाण केलं होतं. त्यामुळे मलालावर तालिबानी नेते नाराज होते. या गोळीबारात मलाला गंभीर जखमी झाली. पुढे केवळ पाकिस्तानच नव्हे तर जगभरातून या घटनेचा तीव्र निषेध झाला. गंभीर जखमी झालेली मलाला वाचली, पण त्यासाठी तिला देशाच्या बाहेर उपचार घ्यावे लागले होते. नंतर ऑक्सफर्ड विद्यापीठात तिनं अभ्यास केला. आता आई-वडील व भावासोबत ती ब्रिटनमध्ये राहाते आणि तिचं सामाजिक कार्य सुरूच आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.