Maldives: भारताकडून दबाव वाढताच मालदीव सरकार नमलं; मोदींवर टिप्पणी करणाऱ्या मंत्र्याला झापलं

मालदीव सरकारमधील एका मंत्र्याने केलेल्या वक्तव्याचे भारतात पडसाद उमटत आहेत. मालदीव सरकारमधील मंत्री मरियम शिऊना यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आले होते
Maldives
Maldives
Updated on

नवी दिल्ली- मालदीव सरकारमधील एका मंत्र्याने केलेल्या वक्तव्याचे भारतात पडसाद उमटत आहेत. मालदीव सरकारमधील मंत्री मरियम शिऊना यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आले होते. याप्रकरणी मालदीव सरकारकडून प्रतिक्रिया आली असून मंत्र्यांच्या वक्तव्याचे आम्ही प्रतिनिधित्व करत नाही, असं स्पष्ट करण्यात आलंय.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीपचा दौरा केला होता. यावरुन मंत्री मरियन यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. याबाबत भारतात नाराजी पाहायला मिळत होती. त्यानंतर मालदीव सरकारने म्हटलंय की, मंत्र्यांचं वक्तव्य हे त्याचे व्यक्तिगत आहे. त्याचा मालदीव सरकारशी कोणताही संबंध नाही. (Maldives Minister Comment On PM Modi Island Nation Response President Mohamed Muizzu

Maldives
मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर सोशल मीडियावर सुरू झाला बॉयकॉट मालदीव ट्रेंड; काय आहे कारण?

महिला मंत्री मरियम शिऊना यांनी पंतप्रधान मोदी यांच्याविषयी सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट केली होती. याविषयी भारताने मुइझु सरकारकडे मुद्दा उचलला होता. मालदीवमधील भारतीय उच्चायुक्ताने मंत्र्याच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला होता. त्यानंतर अखेर मालदीव सरकार नमलं असून आपल्या मंत्र्याच्या वक्तव्यापासून स्वत:ला दूर केलं आहे.

पंतप्रधान मोदी यांनी लक्षद्वीप दौरा केला. त्यानंतर त्यांनी काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केली होती. त्यांनी लोकांना आवाहन केलं होतं की लक्षद्वीपला भेट द्यावी. पर्यटनासाठी ही उत्तम जागा आहे. मोदींच्या या पोस्टनंतर मालदीवच्या एका मंत्र्याला मिरची लागली होती. युवा सशक्तीकरण मंत्री मरियम शिऊना यांनी आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. त्यानंतर भारतीय नेटकऱ्यांनी प्रचंड रोष व्यक्त केला होता.

Maldives
लक्षद्वीपचं सौंदर्य बघून मालदीव विसराल

मालदीव सरकारने म्हटलं की, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उपयोग लोकशाही पद्धतीने आणि जबाबदारीने केलं पाहिजे. द्वेष पसरवणारे, नकारात्मक वक्तव्य करण्यात येऊ नयेत. तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या सहयोगी देशांशी संबंध बिघडू नयेत अशी काळजी घ्यावी. आपत्तीजनक वक्तव्य करणाऱ्या अधिकारी किंवा मंत्री याच्यावर कारवाई करण्यासाठी सरकार मागेपुढे पाहणार नाही.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.