Maldives President: मालदीवच्या हट्टीपणामुळे 14 वर्षांच्या मुलाचा मृत्यू? उपचारांसाठी करायचं होतं एअरलिफ्ट, राष्ट्रपतींनी नाकारली भारतीय विमानाला परवानगी

Maldives President: ज्या मुलासाठी राष्ट्रपतींनी मालदीवमध्ये डॉर्नियर विमानाचा वापर करण्यास मान्यता दिली नाही. त्या मुलाला ब्रेन ट्युमर झाला होता. यामुळे त्यांना अचानक पक्षाघाताचा झटका आला. त्याला त्वरीत उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला.
Maldives President:
Maldives President: Esakal
Updated on

सध्या भारत आणि मालदीवमधील संबंध तणावाच्या काळातून जात आहेत. मात्र, दरम्यान एक बातमी समोर आली आहे ज्यामध्ये एका 14 वर्षांच्या मालदीवच्या मुलाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे. मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइझु हे मुलाच्या मृत्यूचे कारण असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

राष्ट्रपती मोहम्मद मुइझु यांनी एअरलिफ्टसाठी भारताने दिलेले डॉर्नियर विमान वापरण्याची परवानगी नाकारल्यानंतर शनिवारी मालदीवमध्ये एका 14 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती मालदीवच्या माध्यमांनी दिली.

अल्पवयीन मुलाला ब्रेन ट्यूमर होता आणि त्याला अचानक पक्षाघाताचा झटका आला, त्यामुळे त्याची प्रकृती चिंताजनक बनली. मुलाच्या कुटुंबीयांनी त्याची प्रकृती बिघडल्याने त्याला गाफ अलिफ विलिंगिली येथील त्याच्या घरातून राजधानी माले येथे नेण्यासाठी एअर अॅम्ब्युलन्सची विनंती केली. मालदीवच्या मीडियानुसार, अधिकाऱ्यांनी तात्काळ वैद्यकीय स्थलांतराची व्यवस्था करण्यासाठी अर्ज केला होता.

Maldives President:
China Fire : आगीच्या दोन वेगवेगळ्या घटनेत २१ जणांचा मृत्यू; वसतिगृहातील आगीत १३ विद्यार्थी होरपळले

मालदीव मीडियाने मुलाच्या वडिलांच्या हवाल्याने सांगितले की, 'आम्ही स्ट्रोकनंतर लगेचच त्याला माले येथे नेण्यासाठी आयलँड एव्हिएशनला कॉल केला पण त्यांनी आमच्या कॉलला उत्तर दिले नाही. गुरुवारी सकाळी साडेआठ वाजता त्यांनी फोनला उत्तर दिले. अशा प्रकरणांवर उपाय म्हणजे एअर अॅम्ब्युलन्स आहे.'16 तासांनी मुलाला माले येथे आणण्यात आले'. दरम्यान, आपत्कालीन स्थलांतराची विनंती प्राप्त झालेल्या आसंधा कंपनी लिमिटेडने एका निवेदनात म्हटले आहे की, त्यांनी विनंतीनंतर लगेचच निर्वासन प्रक्रिया सुरू केली, परंतु "दुर्दैवाने, उड्डाणातील तांत्रिक समस्येमुळे शेवटच्या क्षणी वळवणे शक्य झाले नाही".

Maldives President:
Fence on Myanmar Border: म्यानमार सीमेवर कुंपण घालण्याचा केंद्राचा निर्णय; मुक्त संचारावरही बंदी

मालदीवच्या मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेल्या अपमानास्पद टिप्पण्यांमुळे भारत आणि द्वीपसमूहातील राजनैतिक संबंध अलीकडेच बिघडले असताना हा प्रकार घडला आहे. मुलाच्या मृत्यूवर भाष्य करताना मालदीवचे खासदार मिकेल नसीम म्हणाले, 'लोकांनी राष्ट्रपतींच्या भारताप्रती असलेले वैर पूर्ण करण्यासाठी प्राण देऊन किंमत चुकवू नये.'

Maldives President:
Attacks of 9/11 : ‘वर्ल्ड ट्रेड सेंटर’वरील दहशतवादी हल्ल्यात झाला होता मृत्यू; तब्बल बावीस वर्षांनंतर पटली ओळख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.