Maldives: भारतीय सैनिकांना परत जाण्यास सांगितलं; मालदीवच्या राष्ट्रपतींचा काय आहे प्लॅन?

मालदीवचे नवनिर्वाचित राष्ट्रपती मोहम्मद मुइझ्झू यांनी पदाची शपथ घेतली. शपथ घेऊन २४ तास झाले नाहीत तोपर्यंत त्यांनी भारताच्या प्रतिकूल भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे.
maldives president mohamed muizzu stand india and china relationship
maldives president mohamed muizzu stand india and china relationship
Updated on

नवी दिल्ली- मालदीवचे नवनिर्वाचित राष्ट्रपती मोहम्मद मुइझ्झू यांनी पदाची शपथ घेतली. शपथ घेऊन २४ तास झाले नाहीत तोपर्यंत त्यांनी भारताच्या प्रतिकूल भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी मालदीवमध्ये असलेल्या भारतीय सैन्यांना परत बोलवून घेण्याची औपचारिक विनंती केंद्र सरकारकडे केली आहे. (maldives president mohamed muizzu stand india and china relationship)

सत्तेत आल्यास भारतीय सैन्य परत पाठवू असं आश्वासन मुइझ्झू यांनी दिलं होतं. त्यानुसार ते आता नवी दिल्लीकडे यासंदर्भात मागणी करत आहेत. शपथविधीच्या कार्यक्रमामध्ये केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू आणि मुइझ्झू यांची भेट झाली होती. यावेळी त्यांच्याकडे ही मागणी करण्यात आल्याचं कळतंय. राष्ट्रपतीपद संभाळल्यानंतर मुइझ्झू म्हणाले होते की, मालदीवमध्ये कोणतेही विदेशी सैन्य असणार नाही याबाबत आम्ही खात्री करु.

मालदीवमध्ये भारतीय सैनिक

मालदीवमध्ये भारताचे फक्त ७० सैनिक आहेत. भारत पुरस्कृत रडार आणि विमानांच्या देखरेखीसाठी हे सैनिक तैनात आहेत. याठिकाणी तैनात असलेली भारतीय युद्धनौका स्पेशल इकॉनॉमिक भागात देखरेख करण्यासाठी मदतीची ठरते. मालदीवमध्ये अनेक मदत कार्यांमध्ये भारतीय सैनिकांची कामगिरी महत्त्वाची ठरली आहे. भारतीय जवान याठिकाणी प्रामुख्याने पायलटचे काम करत असतात.

भारतीय सैनिकांची एक तुकडी गेल्या अनेक वर्षांपासून मालदीवमध्ये तैनात आहे. मंत्रालयाने म्हटलं होतं की, भारतीय जवांनाची द्विपसमूहात मानवीय मदत, आपत्ती मदतकार्य आणि बेकायदेशीर समुद्री घडामोडी यांचा सामना करण्यासाठी महत्त्वाची भूमिका आहे.

maldives president mohamed muizzu stand india and china relationship
मुले बनली कुटुंबाची ‘टूर प्लॅनर'; पुणे ते मालदीव सहलीचे यशस्वी नियोजन

भू-राजकीय हॉटस्पॉट

कमी क्षेत्रफळ असलेल्या या देशात जवळपास ५ लाख लोक राहतात. पर्यटनासाठी हा देश प्रसिद्ध आहे. पण, या देशाचे हिंद महासागरातील स्थान भू-राजकीयदृष्या अत्यंत महत्त्वाचे आहे. हिंद महासागराचे आंतरराष्ट्रीय राजकारणात महत्त आहे. दुसरीकडे, आशियामध्ये आपले नेतृत्व प्रस्थापित करु पाहणाऱ्या भारत आणि चीन यांच्यामध्ये यावरुन प्रतिस्पर्धा आहे. त्यामुळे मालदीव दोन्ही देशांसाठी सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या ठिकाणी आहे.

दिर्घकालीन दृष्टीकोण ठेवून भारत आणि चीन या दोन्ही देशांमध्ये मालदीवमध्ये विकासकार्य हाती घेतले आहे. मोठी गुंतवणूक केली आहे. मालदीवसारखा छोटा पण अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी असलेला देश आपल्या बाजूने असणे नवी दिल्ली आणि बिजिंसाठी फायद्याचे ठरणार आहे.

maldives president mohamed muizzu stand india and china relationship
निळा निळा समुद्र अनुभवायचा असेल तर मालदीव ट्रीपसाठी बेस्टच

मुइझ्झूचा चीनकडे कल

राष्ट्रपती मुइझ्झू हे इब्राहिम मोहम्मद यांना हरवून सत्तेत आले आहेत. माजी मंत्री आणि मालेचे महापौर राहिलेले मुइझ्झू हे माजी राष्ट्रपती अब्दु्ल्ला यामीन यांचे निकर्टवर्तीय आहेत. अब्दुल्ला यामीन यांनी २०१३ ते २०१८ या आपल्या कार्यकाळात चीनकडून मोठ्या प्रमाणात कर्ज घेतले होते. त्यांचेच शिष्य असलेले मुइझ्झू यांनी चीनसोबत घनिष्ठ मैत्रीचे वक्तव्य केली आहेत.

अब्दुल्ला यामीन यांना भष्ट्राचार आणि इतर काही प्रकरणात कोर्टाने दोषी ठरवलं होतं. त्यांना ११ वर्षे तुरुंगवास सुनावण्यात आल्यामुळे त्यांना निवडणूक लढता आली नाही. त्यामुळे त्यांनी मुइझ्जू यांना राष्ट्रपतीपदासाठी पुढे केलं होतं.

maldives president mohamed muizzu stand india and china relationship
Maldives Trip : स्वस्तात प्लॅन करा मालदीव ट्रीप

संतूलन राखण्याचा प्रयत्न

राष्ट्रपतीपदी निर्वाचित झाल्यानंतर त्यांनी भारतीय सैनिकांना परत पाठवण्याची तयारी केली आहे. तसेच, त्यांनी चिनी सैनिकांच्या तैनातीलाही विरोध केला आहे. त्यामुळे त्यांनी एकप्रकारे संतुलन राखण्याचा प्रयत्न केल्याचं बोललं जातं. शपथ घेताना मुइझ्झू म्हणाले होते की, देशाच्या सुरक्षेची गोष्टी येईल तेव्हा मालदीव एक लाल रेषा ओढेल.

एका मुलाखतीत मुइझ्झू म्हणाले होते की, 'भारतीय सैनिकांच्या ऐवजी चिनी सैनिकांना देशात आणण्याचा त्यांचा इरादा नाही. मालदीव चीन आणि भारत या दोन्ही देशांसोबत संतुलित संबंध ठेवण्याचा प्रयत्न करेल.' राष्ट्रपती मुइझ्झू यांची खरी भूमिका स्पष्ट होण्यासाठी आणखी काही काळ जावा लागेल. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.