मालदीवच्या मंत्र्यांकडून PM मोदींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य, आता राष्ट्रपती मोइझु पोहचले चीन दौऱ्यावर; म्हणाले...

मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइझु सोमवारी रात्री चीनच्या दौऱ्यावर पोहचले आहेत. हा त्यांचा पहिलाच राजकीय दौरा आहे.
maldives president mohammed muizzu china visit amide tention with india marathi news
maldives president mohammed muizzu china visit amide tention with india marathi news
Updated on

मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइझु सोमवारी रात्री चीनच्या दौऱ्यावर पोहचले आहेत. हा त्यांचा पहिलाच राजकीय दौरा आहे. बीजिंग येथे पहोचल्याबरोबर त्यांनी चीनला आपला विश्वासू सहकारी असल्याचे म्हटले आहे, तसेच त्यांनी राजकीय संबंधाचे कौतुक देखील केले आहे.

चीन समर्थक मानले जाणारे मुइझु हे पाच दिवसांच्या आपल्या चीन दौऱ्यावर आहेत, सोमवारी दौऱ्याच्या पहिल्या दिवशी फुजियान येथे अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.

सध्या मालदीव आणि भारत यांच्यात तणाव निर्माण झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी मालदीव सरकारच्या तीन मंत्र्यांना सस्पेंड करण्यात आल आहे. अशा परिस्थितीत मुइझु हे चीनच्या दौऱ्यावर गेले आहेत.

मात्र मुइझु यांच्या या दौऱ्याबद्दल चीनकडून अद्याप अधिकृतरित्या कुठलीही माहिती देण्यात आलेली नाहीये. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयायने यापूर्वी सांगितलं होतं की, मुइझु चीन चे राष्ट्रपती शी जिनपींग यांच्यासोबत चर्चा करतील आणि या चर्चेदरम्यान अनेक करारांवर देखील स्वाक्षऱ्या करण्यात येतील.

maldives president mohammed muizzu china visit amide tention with india marathi news
Sharad Mohol Murder : पुण्यात गँगवॉर भडकणार? मोहोळवर गोळीबार करताना आरोपीकडून कुख्यात गुंडाच्या नावाने घोषणाबाजी

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्त वांग वेनबिन यांनी सांगितलं की, मुइज्जू यांची चीनचे राष्ट्रपती जिनपिंग यांच्याशी भेट होणे बाकी आहे. सोबतच द्विपक्षीय अनेक करार देखील होणार आहेत. वांदने सांगितलं खी चीन आणि मालदीव यांच्यातील संबंध नवीन ऐतिहासिक स्तरावर पोहचतील. आम्हाला विश्वास आहे की, या दौऱ्याच्या माध्यमातून दोन्ही राष्ट्रप्रमुख द्विपक्षीय संबंधांना नवीन उंचीवर घेऊन जातील.

मुइझु यांनी चायन कम्युनिकेशन्स कंस्ट्रक्शन कंपनी (सीसीसीसी) च्या अधिकाऱ्यांसबोत झालेल्या बैठकीत मालदीवच्या विकासात चीन एक महत्वाचा सहकारी असल्याचे सांगितले. सीसीसीसी मालदीवमध्ये अनेक प्रोजेक्टवर काम करत आहे. त्यांनी दोन्ही देशांमधील संबंधांना नव्या उंचीवर घेऊन जाणे, तसेच विविध क्षेत्रात भागीदारी वाढवण्यावर देखील भर दिला. त्यानी यानंतर सत्तारुढ कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाचे सचिव झू जूयी यांची भेट देखील घेतली. मुइज्जू यांनी मालदीव दोन्ही देशांच्या संबंधाना महत्व देतो आणि विविध क्षेत्रात भागीदारी वाढवण्याची अपेक्षा व्यक्त केली.

maldives president mohammed muizzu china visit amide tention with india marathi news
Maldives: भारताकडून दबाव वाढताच मालदीव सरकार नमलं; मोदींवर टिप्पणी करणाऱ्या मंत्र्याला झापलं

पहिल्या दौऱ्याने वाद का पेटलाय?

मुइझु चीनच्या पहिल्या राजकीय दौऱ्यावर गेले आहेत, मात्र मालदीवच्या तीन मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीच्या पार्श्वभूमीवर हा दौरा होत आहे. हे प्रकरण पेटलेले असताना भारताने मालदीवच्या राजदूतांना बोलवले होते आणि या प्रकरणी तीव्र आक्षेप नोंदवला होता. यादरम्यान दोन्ही देशात राजकीय तणावाचे वातावरण आहे.

मालदीवचे नवे राष्ट्रपती मोहम्मद मुइझु यांनी आपल्या निवडणूक जाहिरनाम्यात तब्बल ७५ भारतीय सैनिकांची एक तुकडी हटवणार असल्याचे आश्वासन दिले होते. भारतीय सैनिकांच्या वापसीवर चर्चेसाठी भारत आणि मालदीवने एक कोर ग्रुपची स्थापना केली आहे. मुइझु यांची घोषणा होती की 'इंडिया आऊट'. त्यांनी मालदीवच्या इंडिया फर्स्ट पॉलिसीमध्ये देखील बदल करणार असल्याचे सांगितले होते. तर भारत आणि चीन दोन्ही देशही मालदीववर प्रभाव टाकण्यासाठी स्पर्धा करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.