Gold Mine Collapse : सोन्याची खाण ठरली जीवघेणी! मालीत भीषण अपघातात 70हून अधिक लोकांचा मृत्यू

आफ्रिकेतील सर्वात मोठ्या सोने उत्पदक देशांपैकी एक असलेल्या मालीमध्ये सोन्याच्या खाणीत झालेल्या दुर्घटनेत 70 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
Mali gold mine collapse kills more than 70 died Mali search operation underway
Mali gold mine collapse kills more than 70 died Mali search operation underway
Updated on

आफ्रिकेतील सर्वात मोठ्या सोने उत्पदक देशांपैकी एक असलेल्या मालीमध्ये सोन्याच्या खाणीत झालेल्या दुर्घटनेत 70 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. या अपघातातील मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता असून शोध सुरू आहे. सरकारच्या राष्ट्रीय भूगर्भशास्त्र आणि खाण संचालनालयाचे वरिष्ठ अधिकारी करीम बर्थे यांनी बुधवारी या दुर्घटनेला दुजोरा दिला. मालीमध्ये अलीकडच्या काळातील ही सर्वात मोठी खाण दुर्घटना आहे

मीडिया रिपोर्ट्सनुसार, शुक्रवारी झालेला अपघात कशामुळे झाला हे स्पष्ट होऊ शकले नाही. खाण मंत्रालयाने मंगळवारी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अनेक खाण कामगारांचा मृत्यू झाल्याचा अंदाज लावण्यात आला ोता. दक्षिण-पश्चिम कौलिकोरो प्रदेशातील कांगाबा जिल्ह्यात हा अपघात झाला.

Mali gold mine collapse kills more than 70 died Mali search operation underway
Mary Kom Retirement : 'मी निवृत्ती घेतलीच नाही..', बॉक्सर मेरी कोमचा मोठा खुलासा!

आफ्रिकेतील सोन्याचे उत्पादन करणारा तिसरा सर्वात मोठा देश असलेल्या मालीमध्ये असे अपघात सर्रास घडतात. मात्र सुरक्षेच्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांच्यावर अनेकदा होतो. भविष्यात असे अपघात टाळण्यासाठी सरकारने या प्रभावी यंत्रणा खाण क्षेत्रात आणली पाहिजे, असे बार्थे म्हणाले. खाण मंत्रालयाच्या निवेदनात या दुर्घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त करण्यात आले आहे आणि खाण कामगारांना तसेच खाण साइट्सजवळ राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षा उपाययोजनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Mali gold mine collapse kills more than 70 died Mali search operation underway
Maratha Reservation : पुण्यातील रस्त्यांवर जनसागर; राज्य सरकार सावध, मराठ्यांची लाट मुंबईच्या दिशेने

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.