Donald Trump Assassination Plan: डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील हल्ल्यामागे इराण? पाकिस्तानी आरोपी अमेरिकन गुप्तहेराच्या जाळ्यात

Asif Merchant: एप्रिल 2024 मध्ये, इराणमध्ये काही काळ राहिल्यानंतर, मर्चंट पाकिस्तानमधून युनायटेड स्टेट्समध्ये आला. त्याने हत्येचा कट रचण्यासाठी एका व्यक्तीशी संपर्क साधला होता.
Man Behind Donald Trump Assassination Plan Arrested
Man Behind Donald Trump Assassination Plan ArrestedEsakal
Updated on

इराणशी संबंध असलेल्या 46 वर्षीय पाकिस्तानी नागरिकावर मंगळवारी अमेरिकेच्या भूमीवर राजकारणी तसेच अमेरिकन सरकारी अधिकाऱ्यांच्या हत्येचा अयशस्वी कट रचल्याचा आरोप निश्चित करण्यात आला असल्याची माहिती समोर आली.

असिफ रझा मर्चंट विरोधात ब्रुकलिनमधील फेडरल न्यायालयातील तक्रारीत म्हटले आहे की, आरोपी अमेरिकन भूमिवर राजकीय नेते किंवा सरकारी अधिकाऱ्यांची हत्या करण्याच्या योजनेचा एक भाग असून त्याने शूटर्सना हत्येच्या सुपाऱ्या दिल्या आहेत.

असे असले तरी यातील सर्व हल्ले होण्यापूर्वीच अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणांनी हल्ल्यांचे हे कट हाणून पाडले आहेत.

न्यूयॉर्कमध्ये फेडरल कोठडीत असलेल्या मर्चंटने पाकिस्तान आणि इराणमध्ये त्याच्या पत्नी आणि मुले असल्याचा दावा केला आहे.

अमेरिकेचे ऍटर्नी जनरल मेरिक गार्लंड यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, "इराणचे जनरल कासेम सुलेमानी यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी इराण अमेरिकेतील अधिकाऱ्यांना लक्ष्य करत आहे. त्यांचे हे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी न्याय विभाग अनेक वर्षांपासून आक्रमकपणे काम करत आहे."

Man Behind Donald Trump Assassination Plan Arrested
Muhammad Yunus : युनूस यांच्याकडे हंगामी सरकारची जबाबदारी? विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार मुख्य सल्लागारपदासाठी मान्यता

न्यायालयाच्या कागदपत्रांनुसार, मर्चंटने अमेरिकेच्या भूमीवर राजकीय नेते तसेच अमेरिकन सरकारी अधिकाऱ्यांची हत्या करण्याचा कट रचला.

एप्रिल 2024 मध्ये, इराणमध्ये काही काळ राहिल्यानंतर, मर्चंट पाकिस्तानमधून युनायटेड स्टेट्समध्ये आला. त्याने हत्येचा कट रचण्यासाठी एका व्यक्तीशी संपर्क साधला होता. मात्र, त्या व्यक्तीने मर्चंटच्या या कटाची माहिती सुरक्षा यंत्रणांना दिली होती.

46 वर्षांच्या असिफ मर्चंटला न्यूयॉर्कमध्ये 12 जुलै रोजी अटक करण्यात आली होती. त्याच्या आदल्या दिवशी मॅथ्यू क्रूक्स या 20 वर्षीय तरुणाने पेनसिल्व्हेनियामधील रॅलीदरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या.

Man Behind Donald Trump Assassination Plan Arrested
Bangladesh Student Protest : परिस्थिती पूर्वपदावर येण्यास सुरुवात ; राजधानी ढाक्यातील तणाव निवळला,इतरत्र हिंसाचारात २४ तासांत शंभर मृत्युमुखी

FBI च्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, मर्चंटच्या टार्गेट्समध्ये माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इतर आजी आणि माजी अमेरिकन सरकारी अधिकारी यांचा समावेश होता.

जूनच्या मध्यात, मर्चंटने अशा काही व्यक्तींशी भेट घेतली होती ज्यांना तो हिटमन मानत होता. पण ते प्रत्यक्षात अमेरिकेचे गुप्तहेर होते. मर्चंटला अटक करण्यापूर्वी त्याने अमेरिकन अधिकाऱ्यांच्या हत्येसाठी $5,000 ॲडव्हान्स दिले होते, अशीही माहिती समोर आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.